
नागपूर: केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या शासनकाळात मी नागरी उड्डयन मंत्री असताना हज साठी नागपूर वरून पहिली विमानसेवा भारतीय जनता पक्षाने सुरू केली असे विधान माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी केले.
केंद्रीय मंत्री व नागपूर मधील लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले. आज देशात सर्वात चांगले नेते हे नरेंद्र मोदी आहेत तर सर्वात चांगले खासदार आणि मंत्री हे नरेंद्र मोदी असल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे देशातील सर्वात चांगले मुख्यमंत्री आहेत. नागपूरला गेल्या पाच वर्षात गडकरी यांनी संपूर्णतः बदलले, ते खरे विकासपुरुष असल्याचे हुसैन यांनी सांगीतले. नागपूर किंवा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात विकासाची गंगा गडकरी यांनी वाहिली. बिहार मध्ये २० हजार कोटींचे काम त्यांनी केले. ५ हजार कोटींपेक्षा जास्त काम माझ्या भागलपुर उमेदवारी क्षेत्रात गडकरी यांनी केल्याची माहिती हुसैन यांनी दिली.
एवढ्या कमी वेळात मेट्रो ती सुद्धा फोर लेनची नागपुरात आणली याचेही हुसैन यांनी कौतुक केले. मोदी यांनी गरिबांसाठी ५ लाखांच्या आरोग्य योजना राबवल्या याचाही उल्लेख हुसैन यांनी भाषणात केला. या प्रसंगी भाजपचे आमदार व शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे, सर्व नगसेवक,नगरसेविका,भाजपचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur