
नागपूर: भारतीय जनता पक्षाला तीन राज्यांमध्ये मार बसला त्यानंतर लक्षात आलं आणि महराष्ट्रात चक्क लोकसभेच्या ५० टक्के जागा म्हणजे अर्ध्या जागा त्यांनी शिवसेनेला दिल्या हा पक्ष् इतका खाली उतरला, भाजपला शिवसेनेसोबत तडजोड करावी लागली. यावरुन स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर आहे. तडजोड काहीका असेना विदर्भाकरीता शून्य आहे. याचा अर्थ राजकारण काहीका असेना लोकांचे प्रश्न तेच असतात, विदर्भाचे प्रश्नही तेच आहेत, काँग्रेसने विदर्भासाठी काहीही केले नाही तरीही ते विदर्भात येऊन मते मागतात,दूसरीकडे पुलवामानंतर चित्र रंगवले गेले काँग्रेस किती व कशी नाकर्ती आहे,भारताच्या स्वातंत्र्यानंतरची ही पहीलीच अशी निवडणूक आहे ज्यात मुद्दाच नाही अशी घणाघाती टिका विदर्भ राज्य आघाडीचे नेते ॲड. श्रीहरी अणे यांनी केली.
ते नागपूर लोकसभेतून बहूजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार ॲड.सुरेश माने यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्र-परिषदेत बोलत होते. याप्रसंगी मंचावर ॲड.सुरेश माने, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ॲड.वामनराव चटप,राजकुमार तिरपूडे उपस्थित होते.पुढे बोलताना ॲड.अणे म्हणाले की,नागपूरमध्ये तर काँग्रेस हा पक्ष् लाजेखातर निवडणूक लढवतेय. बाहेर गावावरुन त्यांना उमेदवार आणावा लागला. विदर्भाचा मुद्दा घेऊनच त्यांनी खातं उघडलं. विदर्भाच्या मुद्दाचे भांडवल केले. केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवली मात्र विदर्भाचा मुद्दा डावलून चालणार नाही हे दाखवण्यासाठी डॉ.माने हे गडकरींच्या विरोधात उभे आहेत. आमच्यासाठी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष् नंबर एकचे शत्रू आहेत. मोदींची छाती ५६ इंजची आहे कि नाही यावर राजकारण चालतंय. हा मंच मात्र विदर्भाच्या मुद्दासाठी लढतो. तेलांगणात वेगळ्या राज्याच्या निर्मितीसाठी १२०० आंदोलक शहीद झाले म्हणून विदर्भातही माणसे शहीद झाली पाहिजेत का?असा सवाल त्यांनी केला. भाजप आणि शिवसेनेला विदर्भातून हद्दपार करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. विदर्भाच्या प्रश्नासारखीच बेरोजगार, शेतकरी,सामान्य नागरिक,गृहीणी यांची फसवणूक त्यांनी केली. लासलगावात ७० पैसे भाव कांद्याला मिळतोय. ही ‘निवडणूक नाही तर आंदोलन’ असल्याचे ते म्हणाले.
जनतेपुढे मी विदर्भाचा जागर करतोय ‘अभी नही तो कभी नही’. तुम्हीच नागपूरमधून निवडणूक का लढवित नाही?या प्रश्नावर ॲड.अणे म्हणाले की अगदी सुरवातीपासून माझे भाषण तपासून बघा,मी कधीही निवडणूक लढणार नाही अशी घोषणा मी केली होती. मीच काय तर वामनराव चटप,राजकुमार तिरपूडे हे देखील निवडणूक लढणार नाही. आमचं कार्य हे निवडणूकीसाठी नाही. बहूजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्ष्ासोबतच महामंच हा पुढील निवडणूकीत देखील सोबत राहणार नाही. पुढील निवडणूकीत विद्यार्थी, तरुण, महिला यांनी लढवावी अशी आमची ईच्छा आहे,असे ते म्हणाले.
गडकरी यांची विकासाची व्याख्याच वेगळी!
गडकरी यांची विकासाची व्याख्याच वेगळी असल्याचे ते म्हणाले. आम्ही विदर्भाचा बॅकलॉग भरुन काढतोय,विदर्भाचा विकास करतोय असे म्हणणे द्यांदात खोटे आहे. सिमेंट रस्ते किंवा मेट्रो म्हणजे विकास नव्हे. विदर्भाचे प्रश्न मूलभूत आणि तितकेच वेगळे आहे. गढचिरोलीतील नक्ष् लग्रस्त गावात साधा एक पूल बनवण्याची हिंमत नाही मात्र हिमालयात पूल बांधल्या जातोय,अशी टिका त्यांनी केली. भंडारा,गोंदिया आणि अर्धे विदर्भ हे आजही नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे, तिथे महाराष्ट्र सरकारची सत्ता चालत नाही. त्यांचा विकास म्हणजे फक्त नागपूरचा विकास आहे. त्यांच्या मते नागपूर-मुंबई महामार्ग म्हणजे विकास आमच्यासाठी शेती,शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणे हा विकास आहे. आजी २ लाख विदर्भातील तरुण हे नोकरीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जात आहेत. गडकरी आणि फडणवीस यांनी विदर्भाच्या प्रश्नावर कमालीचे औदासिन्य दाखवले आहे. तेलंगणाप्रमाणे जाळपोळ,हिंसाचार केला तरच विदर्भ या प्रश्नाची दखल घेऊ असे ते समजतात. आम्हाला ‘मृत्यूच्या आकड्यांवर राज्य मिळवायचे नाही’ ते सत्तेत असताना विदर्भ राज्य बनवण्याची प्रक्रिया का सुरु केली नाही?हा प्रश्न जनतेनेच आता त्यांना विचारावा. आदीवासींच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने ३३ टक्के कपात केल्याची माहिती चटप यांनी यावेळी दिली. विकासाला पैसे नसताना ‘कर्ज काढून पाहूणचार’ चालला असल्याचे ते म्हणाले.
डॉ.माने यांनी यावेळी गडकरी हे नेहमीच विकासाच्या मुद्दावर वनजमिन कायदावर बोट ठेवतात. या कायदामुळे विकास करता येत नाही. कोणत्याही राज्यात ३० टक्के ही वनजमिनीचा औद्योगिक कायदा आहे. महाराष्ट्रात तर या ३० टक्क्यांपैकि ६४ टक्के जमीन एकट्या विदर्भात आहे. गडकरी यांनी विदर्भ वेगळा करावा आणि महाराष्ट्रापासून तसेच वनजमिन कायद्याच्या जाचापासून मुक्तता मिळवावी अशी मागणी डॉ.माने यांनी केली.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur