
नागपूर: लोकसभा निवडणूक मतदानाची वेळ जवळ आली असून नागपूरातील सर्वच उमेदवारांचे ह्दयाचे ठोके आता चांगलेच वाढले आहे. नागपूरकर जनतेला जिथे पाच-पाच वर्ष वार्डातील नगरसेवकांचे दर्शन दुलर्भ असतात तिथे आमदार किवा खासदार यांच्याविषयी तर बोलणेच नको. मात्र नागपूरातील आसीनगर झोन मधून नगरसेवक असणारे तसेच लोकसभा निवडणूकीत बहूजन समाज पक्षाचे उमेदवार असणारे मोहम्मद जमाल मात्र वरील उक्तीला अपवाद आहेत. २००४ पासून जमाल हे बहूजन पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत बहूजन पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पक्षाप्रति या निष्ठेचे फळ म्हणून यंदा त्यांना चक्क पक्षातर्फे खासदारकीसाठी उभे केले. नागपूर महानगरपालिकेच्या विशेष सभांमध्ये नेहमीच अंत्यंत प्रभावीपणे जमाल हे प्रभागाच्या समस्या मांडत असतात आणि सत्तापक्षाला प्रश्नांच्या कोंडीत पकडतात, असा एक नगरसेवक चक्क यंदा लोकसभेची निवडणूक लढवतोय याचे प्रभागातील नागरिकांनाही विशेष अप्रूप आहे. ‘सत्ताधीश’न्यूज पोर्टलशी त्यांनी केलेली ही खास बातचीत.
प्रश्न: सगळ्याच पक्षाचे उमेदवार गल्लोगल्ली फिरुन घाम गाळतात आहेत,मते सगळ्यांनाच हवी आहेत मात्र काँग्रेस महाआघाडीत सामिल असलेले पीपल रिब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे यांनी प्रचारादरम्यान ‘महिलांचे जेवढे मोठे कूंकू तितके तिला नवरे’अशी कोटी केंद्रिय मंत्री स्मृती इराणीला उद्देशून केली,याबाबत तुमचे काय मत आहे?
उत्तर: हम ऐसी गंदी सोच का विरोध करते है. महिलांच्या विषयी इतक्या खालच्या पातळीची टिपण्णी मग ती महिला कोणत्याही पक्षाच्या असो योग्य नाही. आमच्या बहूजन समाज पक्षाचे नेते काशीराम यांनी तर एका महिलेच्या हातातच पक्षाचे नेतृत्व सोपवले यावरुन आमच्या पक्षात महिलांचा किती सन्मान होतो हे लक्षात येतं. ‘महिलाओ के सन्मान में,बहूजन समाज पार्टी मैदान में’ हा आमच्या पक्षाचा नाराच आहे. खरे सांगायचे तर जयदीप कवाडे हे ज्या पक्षातून आले आहेत जी पूर्व भारतीय जनता पार्टी असो किंवा सध्या ते ज्या पक्षात सामिल आहेत ती काँग्रेस पार्टी असो,या दोन्ही पक्षाचे पक्षाचे विचार आणि मानसिकता याचाही प्रभाव जयदीप कवाडे यांच्यावर पडला असावा.काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांनी नाना पटोले यांनी कवाडे यांच्या या वक्तव्यावर त्यांची पाठ थोपटली ते ही महिला विरोधीच आहेत. खैरलांजी प्रकरणातही पटोले यांनी अशीच महिला विरोधी आणि दलित विरोधी भूमिका घेतली होती म्हणूनच बहूजन समाजाचा त्यांच्यावर राग आहे आणि तो राग आता मतदानातून व्यक्तही होणार आहे.
प्रश्न: काँग्रेसच्या जाहीरनाम्याविषयी काय बोलाल?
उत्तर: अतिशय ‘फेकू’जाहीरनामा! सहा हजार रुपये प्रत्येकाच्या बॅंक खात्यात जमा होणार होते, कोणी पंधरा लाख सांगतोय आता काँग्रेस ७२ हजार सांगतेय,सर्वात आधी तर हे पैसे राहूल गांधी आणणार कुठून हे देशाला सांगावे. गेल्या ६९ वर्षांपासून काँग्रेस फक्त घोषणाच करतेय. या घोषणांची अंमलबजावणी कधी केली याचीही माहिती घोषणा पत्रात द्यायला हवी होती. आमच्या पक्षाने कधीच घोषणा पत्र जाहीर केले नाही कारण आम्हाला घोषणा पत्रात विश्वास नाही. आमचं घोषणा पत्र म्हणजे ‘भारतीय संविधान’ आहे. संविधानावरच आमचा विश्वास आहे.
प्रश्न: नागपूरातील गुन्हेगारीविषयी काय सांगाल?
उत्तर: गेल्या पाच वर्षात सर्वाधिक गुन्हेगारी नागपूरातच घडली आहे. गुन्हेगारांना कायद्याचा वचकच राहीला नाही कारण कायदा राबिणारेच स्वत: अपराधी प्रवृत्तीचे आहेत. गुन्हेगारांना सत्ताधार चेच संरक्ष् ण मिळाले आहे. कायद्याचा धाकच उरला नाही. पोलिसांवरचही गाड्या चढवल्या जातात. मुख्यमंत्री यांचाचकडे गृहविभाग आहे, मात्र नागपूरातील गुन्हे बघता याला कोणाचे आश्रय आहे हे जनता चांगल्याने ओळखते. प्रशासनाचे तोंड बंद आहे. कारवाई करण्याचे त्यांना आदेशच नाही. ‘लिखा किस्मत मे परदेस तो वतन की याद क्या करता…जहां बेदर्द हाकिम हो वहां फर्याद क्या करता’ २००७ ते २०१२ मध्ये मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात कानून व्यवस्था कठोर होती. सर्व अपराध्यांना जेल मध्ये त्यांनी टाकून दिले. आमची देशात सत्ता आल्यास संपूर्ण देशात कानून व्यवस्था आणखी कठोर करु,गुन्हेगारांना वचक बसेल असा कायदा राबवू.
प्रश्न: आपल्या राजकीय प्रवासाबद्दल काय सांगाल?
उत्तर: यूथ कॉंग्रेस पासून मी १९९० मध्ये राजकीय प्रवासाला सुरवात केली. याच पक्ष्ातर्फे मी वार्डाचा अध्यक्ष् ही झालो. १९९२ साली काँग्रेस पक्षाकडून अपेक्षाभंग झाला. यानंतर सामाजिक कार्यातच स्वत:ला झोकून दिले. २००४ पर्यंत मी सामाजिक कार्य केले. २००४ साली मी बहूजन समाजवादी पक्षात सामिल झालो तेव्हा पासून आजपर्यंत कधीही पक्ष् निष्ठा बदलली नाही व बदलणारही नाही.
प्रश्न: मतदारांना काय आव्हान कराल?
उत्तर: सर्व नागपूरकर मतदारांना अतिशय विनम्रपणे हेच आवाहन करतो यावेळी जे मतदान कराल ते विचारपूर्वक करा. अश्या उमेदवाराला निवडूण द्या जो दिल्लीत जाऊन तुमच्या समस्या मांडेल. शहर आणि देश दोन्हीच्या विकासासाठी झटेल.
प्रश्न: मायावती यांच्या पुतळ्यांचा वाद सर्वोच्च न्यायलयात गेला,काय सांगाल?
उत्तर: देशात फक्त बहन मायावतीजींनीच फक्त पुतळे उभारलेत का? मनुवादी मानसिकतेतून उगाच त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.पुतळे हे इतिहासाची ओळख देतात. येणा रया पिढीला इतिहास कळतो. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी पुतळे उभारले होते. पुतळे उभारणे वाईट नाही मात्र पुतळ्यांना संरक्षण प्रदान करण्यात यावे असे माझे वैयक्तिक मत आहे.
(मुलाखतकर्ता- डॉ.ममता खांडेकर)
……………………..



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur