नागपुरात विकासाची गंगा वाहिलीच नाही- मोहम्मद जमाल

spot_img

नागपूर: नागपुरातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गडकरी यांनी नागपुरातच नव्हे तर देशात विकासाची गंगा वाहील असे गेल्या निवडणुकीत आश्वासन दिले होते मात्र देशात तर सोडा नागपुरातही विकासाची गंगा वाहिलीच नाही असा आरोप बहुजन समाज पक्षाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार मोहम्मद जमाल यांनी रविवारी पत्र-परिषदेत केला. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र प्रदेश महासचिव पृथ्वी शेंडे,सचिव नागोराव जयकर, नागपूर जिल्हा अध्यक्ष विलास सोमकुवर,जिल्हा प्रभारी योगेश लांजेवार,किशोर कॅतल,शहर अध्यक्ष प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अन्सारी म्हणाले,की नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे,गेल्या १० वर्षां पासून शहराचा कारभार हाच पक्ष चालवित आहे मात्र विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना विकास कामासाठी द्यायला स्थायी समितीकडे पैसे नसतात, याची रितसर लिखित तक्रार आम्ही मनपा आयुक्तांकडेही केली. विकासाच्या नावावर शहराचीही धूळधाण करून ठेवण्यात आली. सिमेंट रस्ते कमी,खड्डे जास्त आहेत. पाण्याची तीव्र टंचाईतून नागपुरातील जनतेला मुक्तीच नाही.मनपाच्या मराठी शाळा बंद पडतात आहे, जरी ही निवडणूक राष्ट्रीय पातळीवरची असली तरी नागपूरकर मतदारांच्या समस्या घेऊन मी ही निवडणूक लढवित असल्याचे ते म्हणाले. यासाठीच पहिल्यांदा बहुजन समाज पार्टीने स्थानिक उमेदवार दिला आहे ज्याला लोकल समस्यांची जाणीव आहे. आजपर्यंतच्या इतिहासात बहुजन समाज पक्षाने बाहेरचे उमेदवार लादले असा आरोप होत होता,या वेळी मात्र बहेनजी मायावतींनी म्हणूनच माझी उमेदवारी निश्चित करून विश्वास दर्शवला आहे. माझी उमेदवारी ही बहनजींच्या सोशल इंजिनियरिंगचेच धोरण असल्याचे ते म्हणाले.
कस्तुरचंद पार्कमध्ये येत्या ५ तारखेला बहन मायावतींची विशाल महासभा असल्याची माहिती त्यांनी दिली.या सभेत विदर्भातील तसेच इतर राज्यातील एक लाखपेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित राहणार असून त्यांच्या सभे नंतर खूप परिवर्तन घडून येणार असल्याचे ते म्हणाले.

नागपूर शहरात ५. ५० लाख हे बौद्ध मतदार आहे ३.५० लाख हे मुस्लिम,२ लाख हलबा,३० हजार धनगर तर ओबीसी समाजाचेही लक्षणीय मतदार आहेत. हलबा समाज यावेळी गडकरींवर नाराज आहे, मंडळ आयोगाची अंमलबजावणी न झाल्याने ओबीसी समाजही दुखावला गेला आहे,काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यावरही खैरलांजी वादामुळे बौद्ध धर्मीय नाराज असल्याचे ते म्हणाले. बहुजन समाज पक्षाकडे कॅडर बेस मतदार आहेत.  मी बहुजन पक्षाच्या विचारसरणीमध्ये विश्वास करणारा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा व्यक्ती असून या समाजाची मते मलाच मिळणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.जो समाज काँग्रेसला मत देत नाही तो ही बहुजन पक्षाच्या उमेदवारालाच मत देईल असे ते म्हणाले. तुमच्या विजयात वंचित आघाडी पक्ष अडसर ठरेल का? या प्रश्नावर ‘वंचित आघाडी तो बरसाती मेंढक है’ महाराष्ट्रची जनता सगळं जाणते, मुस्लिम मतदारांनाही AIM च्या विरोधात बहुजन पक्षाचा पर्याय मिलाळा असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेश माने यांच्या उमेदवारी बद्दल बोलताना,ते मूळ मुंबईचे असून त्यांनी नागपुरातून उमेदवारी दाखल केली. माने हे फॅसिस्ट असून बहुजन पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांच्यात उत्तर प्रदेशात युती झाली असल्यामुळे नागपुरात समाजवादी पक्षाच्या मतदारांचीही मते बहुजन पक्षाच्या उमेदवारालाच मिळणार असल्याचे ते म्हणाले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़