
नागपूर: काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी पत्र-परिषद घेऊन ज्या तक्रारी मांडल्या आहेत त्याची दखल निवडणूक अधिकार्यांनी घेतली आहे. कळमनामधून ट्रकवरुन अतिशय सुरक्षितपणे मतपेट्या निर्धारित जागेवर पोहोचवण्यात आल्या. याप्रसंगी २४ तास सीसीटीव्ही कॅमरे सुरु होते. कोणतेही कॅमरे बंद नव्हते. जो व्हीडीयो दाखवण्यात आला आहे त्यात कदाचित डिसप्लेची समस्या असावी. स्ट्रांग रुम बाहेर पोलिसांचा पहारा असतो. त्यांना दिसण्यासाठी डिसप्ले सुरु असतात. डिसप्लेत समस्या निर्माण होऊ शकते मात्र पंचायत भवन व बचत भवनमध्ये कॅमरे बंद ठेवण्यात आल्याची जी तक्रार करण्यात आली आहे ती निराधार असून स्ट्रांग रूमधील कॅमरे ही चोवीस तास सुरु होते याचा व्हीडीयो आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर करु शकतो असा खुलासा जिल्हाधिकारी व नागपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांनी गुरुवार दि.२८ मार्च रोजी पत्र-परिषदेेत केला. २८ मार्च हा नागपूर व रामटेक लोकसभा निवणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.किती उमेदवारांनी अर्ज मागे घेतले किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत याची सविस्तर माहिती त्यांनी पत्र-परिषदेत दिली.
निवडणूक आयोगाने सुरक्षेसाठी जो प्रोटाकॉल जाहीर केला आहे त्याचे परिपूर्ण पालन आम्ही केले आहे. निवडणूक केंद्रात आधी सीसीटीव्ही बसवण्यात आले. पोलीस तैनात करण्यात आले. स्ट्रांग रुमला कोणतेही दूसरे दार नसते. त्या खोलीतील खिडक्याही पॅक करण्यात आले. या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही चोवीस तास सुरु होते याचा संपूर्ण बॅकअप उपलब्ध आहे. कळमनामधून मतपेट्या घेऊन येणार्या ट्रकमध्येही ‘जीपीएस’यंत्रणा बसवलेली असते. तक्रारीत त्यांनी तो ट्रक भाजप पक्ष् ाचा होता याचा कोणताही पुरावा आणून दिला नाही. पुरावा मिळाल्यास योग्य ती कारवाई करु. तसेच काँग्रेसच्या उमेदवारांनी सादर केलेला व्हीडीयो हा अधिकृत आहे की नाही याची देखील शहनिशा करु. मूळात मतदान केंद्रात पोलीस आणि सुरक्षाकर्मींशिवाय कोणालाही जाण्यास बंदी आहे त्यामुळे हा व्हीडीयो आतमध्ये जाऊन कसा बनवण्यात आला याची देखील चौकशी केली जाईल. ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. या दोन्ही ठिकाणे व्हीडीयो अधिकारी आहेत त्यांच्याकडे खुलासा मागू असे देखील मुद् गल यांनी सांगितले. तपशील आल्यावर उल्लंघन झाले असेल तर कारवाई करु. हेतू काय होता याची देखील तपासणी केली जाईल.प्रत्येक मतदार केंद्रावर व्हीडीयो सेवा कार्यरत आहे यात सगळी वेळ रेकॉड होते. मूळात जेव्हा स्ट्रांग रुम उघडली जाते तेव्हा सर्व राजकीय पक्षाचे तसेच अपक्ष् उमेदवार हे उपस्थित असतात. त्यांच्या उपस्थितीची नोंद घेतली जाते. ईव्हीएम गोडाऊन पर्यंत जाणे कुणालाही अशक्य असल्याचे मुदगल हे म्हणाले.
गडीकरी यांनी २५ ता.ला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आकाशवाणी चौकात सभा घेऊन आचार संहितेचा भंग केला अशी तक्रार काँग्रेसकडून मिळाली असल्याचे यावेळी मुद् गल यांनी सांगितले. याबाबत पोसिस यंत्रणेकडे चौकशी केली असून सभेसाठी त्यांनी पूर्व परवानगी घेतली असल्याचे आम्हाला कळविण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती आम्ही मागितली असल्याचे मुदगल यांनी सांगितले.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur