
नागपूर: केंद्रिय निवडणूक आयोगाने निवडणूकी संदर्भात अतिशय स्पष्ट असे दिशा-निर्देश जारी केले आहे मात्र नागपूरात निवडणूक आयोगाच्या दिशा निर्देशाचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. दक्षीण नागपूरातील पंचायत भवन तसेच मध्य नागपूरातील बचत भवनातील स्ट्रांग रुम मध्ये ठेवण्यात आलेले बॅलेट बॉक्स ठेवताना तेथील कॅमेरे हे बंद ठेवण्यात आले होते. याशिवाय ज्या ट्रक मधून हे बॅलेट बॉक्स आणण्यात आले त्यावर हिरवा,भगवा रंग लावला होता,सत्तापक्ष् निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचा गंभीर आरोप नागपूरातून निवडणूकीसाठी उभे असणारे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी गुरुवार दि. २८ मार्च रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. याप्रसंगी मंचावर शहर अध्यक्ष् विकास ठाकरे, अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना नाना म्हणाले,की नागपूरात लोकतंत्राची गळचेपी केली जात आहे. गडकरी हे अापल्या प्रत्येक सभेमध्ये पाच लाख मतांनी जिंकणार असे सांगत आहे त्यांच्या या विधानाला आधार काय? असा प्रश्न नाना यांनी केला.या पद्धतीने ते पाच लाख मते मिळवणार आहेत का?त्यांच्यांकडे पाच लाख मताधिक्यांनी जिंकण्याची कोणती जादुची कांडी आहे? लाेकतंत्राच्या आधारावर नागपूरातील ही निवडणूक लढवली जावी अशी आमची मागणी आहे. पंचायत भवन व बचत भवन मधील कॅमरे का बंद होते याची रितसर तक्रार केंद्रिय तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे केली असून नागपूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी हे नेहमी सभेत त्यांच्या ‘आयक्यू’ २०० कोटींचा असल्याचे सांगतात,वोटींग मशीनमध्ये गडबडीसाठी तर त्यांनी तो वापरला नाही ना? आम्ही डोळ्यात तेल घालून बसलो आहोत,कोणतीही गडबडी होऊ देणार नाही. आम्ही पाठवलेला व्हीडीयो व लेखी तक्रार याची निवडणूक अधिकार्यांनी त्वरीत दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी प्रसार व प्रचार माध्यमांना कॅमरा बंद असलेले व मतपेट्या उतरवण्यात येत असलेला व्हिडीओ दाखवला.
आम्ही वोटिंग मशीन तपासू, ज्या मशीन या दोन ठिकाणी अाणण्यात आल्या त्यावर कॅमराची नजर नव्हती. एकदा मशीनला सीलबंद केले तर त्यानंतर तक्रारीचा उपयोग नाही, उमेदवार म्हणून आम्ही म्हणूनच आमच्या अधिकारांचा उपयोग करीत आहोत. एका प्रश्नाच्या उत्तरावर मी बहूजनांचा नेता आहे जातीवादाचे राजकारण मी करीत नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे माझ्यावर होणारे ‘डीएमके’(दलित,मुस्लिम,कुंबी)मतांच्या राजकारणाचा आरोप निराधार असल्याचे ते म्हणाले. उत्तर नागपूरातील मतदार हे घाबरलेले असून त्यांना बेघर होण्याची भीती दाखवली जात आहे. नागपूरातच नव्हे तर राज्यात आणि देशातही हे सरकार दबाबतंत्राचे,जुमलेबाजीचे आणि भीतीचे सरकार चालवित असल्याचे ते म्हणाले.
गडकरी खोटारडे!
एका प्रश्नाच्या उत्तरात नाना पटोले यांनी गडकरी हे सभेत खोटे बोलत असल्याचे सांगून आमच्या कॉग्रेस पक्ष् ाच्या नेते वा कार्यकर्ते यांनी त्यांना शुभेच्छा नाही दिल्यात,ते खोटारडे आहे. तेच काँग्रेसवाल्यांना फोन करतात, तसेही ते सत्तेत सर्वांचीच कामे करावी लागतात असे जाहीरपणे सांगत फिरतात,त्याच कामाची आठवण करुन देतात. मात्र ‘आमच्याकडे ईमानदार चौकीदार’ असल्याची कोटी नाना यांनी केली. खरे सांगायचे तर भाजप हा घाबरलेला आहे. गडकरी यांंचे २०१४ सालचे भाषण ऐका,खासदार झालो तर मिहानमध्ये रोजगार आणेल मात्र त्यांच्या मुलाचे वार्षिक टर्नओवर पाच हजार कोटीचे झाले असल्याचे विधान पटोले यांनी केले. स्वत:गडकरी यांचा उमेदवारी अर्ज तपासल्यास पाच वर्षात त्यांची संपत्तीत किती तरी पट वाढ झाली असून त्यांच्या पत्नीच्या नावाच्या उत्पन्नात देखील लक्ष् णीय वाढ झाल्याचा आरोप त्यांनी केला.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur