
नागपूर : शेकडो कार्यकर्त्यांसह वाजत गाजत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी तर खा.कृपाल तुमाने यांनी रामटेक मतदारसंघासाठी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेषत्वाने उपस्थित होते. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावेळी ‘रॅली’ काढण्यात आली व भाजपा-शिवसेना-आरपीआय युतीचे शक्तीप्रदर्शन झाले.
सोमवारी निवडणूक अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते सकाळी नऊ वाजल्यापासूनच संविधान चौकात एकत्रित आले होते. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास नितीन गडकरी व कृपाल तुमाने यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने ‘रॅली’ सुरु झाली. खुल्या जीप’मध्ये गडकरी, तुमाने यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. विकास महात्मे, सुलेखा कुंभारे, आ.सुधाकर देशमुख, आ.सुधाकर कोहळे हेदेखील उपस्थित होते. सोबतच आ.अनिल सोले, आ.समीर मेघे, आ.मिलींद माने, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, माजी मंत्री दीपक सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नगरसेवक व पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी अकराच्या सुमारास ही ‘रॅली’ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. त्यानंतर निवडक पदाधिकारी व नेत्यांसह गडकरी व तुमाने यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी गडकरी व मुख्यमंत्र्यांनी आकाशवाणी चौैकात सर्वांना छोटेखानी संबोधन केले. सर्व कार्यकर्त्यांच्या उस्फुर्त प्रतिसादासाठी गडकरी व फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. गडकरी यांच्यासमवेत मुख्यमंत्री सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत होते. गडकरी यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री यांनी स्वत: घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यांच्यापाठोपाठ मग इतर कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात
गडकरी व तुमाने यांच्यासमवेत अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री तसेच उर्जामंत्रीदेखील असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरदेखील पोलीस तैनात होते. गडकरी, तुमाने अर्ज भरत असताना बाहेर हजारो कार्यकर्ते उभे होते.
मोठ्या मताधिक्याने जिंकणार : नितीन गडकरी
मी निवडणूकीसाठी अर्ज भरत असताना नागपुरच्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली हे एकाप्रकारे त्यांचे माझ्यावरील प्रेमच आहे. मागील वेळेपेक्षा माझा विजय जास्त मताधिक्याने होईल असा मला विश्वास आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रालोआला प्रचंड बहुमत मिळेल व मागील वेळपेक्षा जास्त जागांवर आमचा विजय होईल. जनतेने मला समर्थन दिले यासाठी त्यांचे आभार. त्यांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा व विकासाच्या आशा आहेत, त्या मी पूर्ण करेल, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.गडकरी व तुमाने यांच्यासमवेत अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री तसेच उर्जामंत्रीदेखील असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरदेखील पोलीस तैनात होते. गडकरी, तुमाने अर्ज भरत असताना बाहेर हजारो कार्यकर्ते उभे होते.
गडकरी आमचे मार्गदर्शक : मुख्यमंत्री
नितीन गडकरी आमचे मार्गदर्शक आहेत व त्यामुळेच ते अर्ज दाखल करत असताना मी येथे आहे. मला विश्वास आहे की ते यंदा रेकॉर्ड मतांनी विजयी होतील. देशात रालोआला स्पष्ट बहुमत तर मिळेलच, शिवाय राज्यात महायुतीला ४५ जागा मिळतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी केले काम : कृपाल तुमाने
मागील पाच वर्षांत आम्ही रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले काम जनतेने पाहिले आहे. त्यामुळे निवडणूकांत ते कामच बोलेल व जनता परत शिवसेना-भाजप महायुतीवरच विश्वास टाकेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जनतेपर्यंत आम्ही जात आहोत. रामटेकच काय पण राज्यात महायुतीला अपेक्षेहून जास्त जागा मिळतील, असे कृपाल तुमाने म्हणाले.
गडकरींचे कुटुंबीय सुरक्षेविना कार्यकर्त्यांसोबतच
महायुतीची ‘रॅली’ निघत असताना नितीन गडकरी यांचे कुटुंबिय हे कुठल्याही सुरक्षेविना सामान्य कार्यकर्त्यांसोबतच होते. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ते पोहोचले. गडकरी अर्ज भरत असताना ते बाहेरच थांबले होते. त्यांची दोन्ही मुले निखील व सारंग तसेच सुना-नातवंडे हे भर उन्हात आकाशवाणी चौकात प्रतिक्षा करत होते व मुख्यमंत्री,गडकरी यांचे छोटेखानी उद्बोधन कार्यकर्त्यांसोबतच उभे राहून ऐकले.
लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या आज, सोमवारी अखेरच्या दिवशी मतदारांपर्यंत सूचक संदेश देण्याच्या उद्देशाने आघाडी आणि युतीच्या नेत्यांनी शक्तिप्रदर्शनची जय्यत तयारी केली होती. पहिल्या टप्प्यात नागपूर-रामटेकसह विदर्भाच्या सात जागांसाठी येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होईल.
नागपूर लोकसभा मतदारसंघातून कट्टर प्रतिस्पर्धी भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांची नामांकन भरण्याची वेळ एकामागे एक असली तरी, युती आणि आघाडीमुळे कार्यकर्तेही उत्साहात होते. भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेकमधील शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांची रॅली सकाळी १० वाजता संविधान चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळून निघाली. भाजपने आधीच वेळ घेतल्याने त्यांना संविधान चौक मिळाला.
खोटा माणूस खोटं बोलून देशाच्या सत्तेवर आला- विलास मुत्तेमवार
नाना पटोले यांच्यासाठी माजी केंद्रीय विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तयारी करण्यात आली . सर्व गटांचे समर्थन लाभलेल्या पटोले यांच्या रॅलीसाठी विविध गटांचे समर्थक व कार्यकर्ते सहभागी झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. खोटा माणूस खोटं बोलून देशाच्या सत्तेवर आला असल्याची टीका मुत्तेमवार यांनी माध्यमांशी बोलताना केली. नागपूरचा खासदार हे देखील खोट्याचे पुलिंदे असल्याचे ते म्हणाले. नागपुरात इव्हेंट्स साजरे करणाऱ्या या सरकारकडे कोणतेही व्हिजन नसल्याची टीका मुत्तेमवार यांनी केली. नागपुरात रोजी-रोटी,पिण्याचं पाणी,स्वच्छता इत्यादी व्हीजन बाबत हे सरकार फेल आहे,नाना पटोले हे लक्षणीय मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वासही मुत्तेमवार यांनी व्यक्त केला.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur