एम्प्रेस मॉलमधील हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर छापा

spot_img

नागपूर:गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एम्प्रेस मॉलच्या पहिल्या माळ्यावर गाळा क्र. १२१ मध्ये ‘फिनिक्‍स वेलनेस सेंटर’ नावाने मनीष लांजेवार आणि ढेरेक मंचेडो यांचे दुकान आहे. येथे महिला आणि पुरुषांची मसाज थेरपी केली जाते. मनीष आणि ढेरेक यांनी गेल्या दीड वर्षांपासून सेक्‍स रॅकेट सुरू केले. मसाजच्या नावाखाली ५ प्रशस्त रूममध्ये आंबटशौकीन पुरुषांना युवतीशी शारीरिक संबंधाची व्यवस्था करण्यात आली होती. येथे दलाल फैजान शेख हा तरुणी पुरवत होता. गेल्या काही महिन्यांपासून विदेशी तरुणींची मागणी वाढल्यामुळे फैजान आणि मनीष लांजेवार दिल्लीला गेले. तेथून नेपाळ आणि भिलाई येथील तरुणींना देहव्यापारासाठी नागपुरात आणले. दलाल तन्वी महेंद्र चोटलिया (वय २१, निकुंजमोहन क्‍लासिक अपार्टमेंट, गिट्टीखदान) हिच्याकडे दोन्ही तरुणींसाठी आलेल्या ग्राहकांना पैशाचा सौदा करण्याची जबाबदारी देण्यात आली. चौघांनी गेल्या दीड वर्षांपासून मोठे सेक्‍स रॅकेट उघडून लाखोंची उलाढाल केली होती. ही माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्‍त नीलेश भरणे यांना मिळाली. त्यांनी एसएसबीचे उमेश बेसरकर, अनुपमा जगताप यांच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचला. पाठवलेल्या पंटरने मनीष आणि ढेरेक यांची भेट घेत सौदा केला. तन्वी चोटलियाने दोन्ही मुलींना दाखवून पंटरला रूम उपलब्ध करून नेपाळी युवतीला रूममध्ये पाठविले. पंटरने इशारा करताच पोलिसांनी छापा घातला. तन्वीसह तिन्ही युवतींना ताब्यात घेतले.

गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून देहव्यापाराचे अड्डे बिनधास्त सुरू आहेत. काही अड्ड्यांना पोलिसांचा अर्थपूर्ण आशीर्वाद आहे. तसेच महिन्याकाठी मोठी ‘सेटिंग’ असल्याची चर्चा पोलिस दलात आहे. शहरातील सर्वाधिक देहव्यापाराचे अड्डे बेलतरोडी आणि गणेशपेठेत असल्याचे आतापर्यंतच्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे. छत्तीसगड, भिलाई येथील युवतीला २५ हजार रुपये महिना आणि प्रतिग्राहक १ हजार रुपये असा मोबदला देण्यात येत होता. तर नेपाळच्या तरुणीला ६० हजार रुपये महिना आणि २ हजार रुपये प्रतिग्राहक मोबदला मिळत होता. मॉलमध्ये हायफाय ग्राहक येत असल्याने मालक मनीष लांजेवारची कमाई लाखोंमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़