
नागपूर: विवेका हॉस्पिटलने येथील हेरिटेज विहीर बुजवण्याचा प्रयत्न केला. ही सार्वजनिक विहीर नेल्को सोसायटी, सुभाषनगर नागपूर, येथील विवेका हॉस्पिटलच्या बाहेरील ही विहीर आहे, ही विहीर भोसले कालीन असून हेरीटेज आहे. याला तीन दरवाजे आहे. या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही. विवेका हॉस्पिटलचे बांधकाम सुरू असताना तेथील कंत्राटदाराने आणि प्रशासनाने ही विहीर बूजवण्याचा प्रयत्न केला असल्याचे नागरिकांचे तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश नागोलकर यांचे म्हणणे आहे.
यामध्ये पूर्ण मलबा टाकलेला असून यामध्ये आडवा पाईपही टाकलेला आहे. एप्रिल, मे महिन्यातील पाण्याची दुष्काळी परिस्थिती बघता ही विहीर जर पूर्णपणे साफ करून गाळ उपसला तरी ही विहीर आजूबाजूच्या नागरिकांना पाणी उपलब्ध करून देऊ शकते तसेच इतर कामातही हे पाणी वापरामध्ये येऊ शकते. ही सोसायटी उंचीवर असल्यामुळे तसाही इथे कायम पाण्याचा तुटवडा असतो. येथील नागरिकांनी महानगरपालिकेतील आयुक्त व लक्ष्मीनगर झोनचे सहा आयुक्त ,प्रभागातील नगरसेवक सोनाली कडू, प्राध्यापक दिलीप दिवे, प्रमोद तभाने , महापौर व स्थानिक आमदार देवेंद्र फडणवीस यांनी या तक्रारीची त्वरित दखल घेऊन या हॉस्पिटलच्या प्रशासनावर, सार्वजनिक जलसाठा दूषित केल्याप्रकरणी तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान केल्याप्रकरणी पोलिस स्टेशनला तसेच नगरपालिकेकडून कायदेशीर गुन्हे दाखल करून दंडनीय कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ही विहीर पूर्णपणे स्वच्छ करून जलसाठा मोकळा करून द्यावा अशी मागणी केली.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur