हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्य जयंतीनिमित्य पांढरकवडा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

spot_img

शहरामध्ये शिवसेना तालुका व पांढरकवडा शहर यांच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये २०० मोटर सायकल वरून महिला, पुरुष व शिवसैनिक भगवे फेटे बांधून सहभागी झाले होते. हि रॅली मित्र क्रिडा मंडळ पांढरकवडा येथून संपूर्ण गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून श्रीराम मंदिर येथे रॅलीचा समारोप झाला. मिरवणूकीतील गाडीवर नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेबांच्या प्रतिमा पांढरकवडा शहर वासियांचे लक्ष वेधत होते. विशेष म्हणजे पांढरकवडा शहरामध्ये शिवसेनेच्यावतीने प्रथमच एवढया भव्य स्वरूपात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे केळापूर तालुक्यातील व पांढरकवडा शहरातील शिवसैनिकांचे गावातील नागरिकांनी भरभरून कौतुक केले.

रॅलीनंतर दुपारी ३ वाजता पंचायत समिती सभापती कार्यालय पांढरकवडा येथे संजय सिताराम झोिंटग शिवसेना शहर प्रमुख पांढरकवडा यांचे तर्पेâ िंहदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे अनावरण माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पंचायत समिती सभापती सौ.इंदुताई मिसेवार, संतोष बोडेवार पंचायत समिती उपसभापती, सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़