
नवी दिल्ली – मोदी आणि शाहांना विरोध करणाऱ्यांना भाजपमध्ये जागा नाही. पक्षात केवळ हुकूमशाही आहे कोणत्याही प्रकारची लोकशाही नाही, असा आरोप नुकतेच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे. मागील अनेक दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू होती. आज भाजपच्या वर्धापनदिनीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आपण शेतकरी, देशातील बेरोजगार युवक आणि नोटाबंदीच्या विरोधात बोललो म्हणून पक्षात बंडखोर झालोत. जर सत्याची बाजू घेणे बंडखोरी आहे तर आपणही बंडखोरी केली, असे वक्तव्यही सिन्हा यांनी यावेळी केले. नोटाबंदी जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. भाजपने कोणाचाही विचार केला नाही. आणि प्रत्येक वेळी आपल्या विरोधकांना दुश्मन म्हणून पाहिले, असा आरोपही त्यांनी केला आहे. शत्रुघ्न सिन्हा अटलबिहारी वायजपेयींच्या काळात १३व्या लोकसभेमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग मंत्री होते. त्यानंतर २००६मध्ये त्यांना भाजपच्या कला आणि संस्कृती विभाग मिळाला होता. त्यांनी राजेश खन्ना यांच्या विरोधात १९९१च्या पोट निवडणूकांमध्ये दिल्लीच्या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. याच निवडणूकीनंतर त्यांच्या राजकारणात पाय ठेवला होता. राजेश खन्ना विरोधात आपण निवडणूक लढलो याची त्यांच्या मनात खंत होती. अनेक वेळा त्यांनी खन्नांशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रत्येक वेळी ते अपयशी ठरले.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप विरोधात ते पत्रकारांसमोर बोलले. यापूर्वीही त्यांनी भाजपमध्ये असतानाच पक्षावर हल्ला चढवला होता. मात्र, यावेळी त्यांनी काँग्रेसचा सदस्य म्हणून भाजपला धारेवर धरले. आपण भाजपला लोकशाहीतून हुकूमशाहीमध्ये परिवर्तीत होताना पाहिले आहे. आपण सत्य आणि सिद्धांतांवर टिकून राहिलो एवढाच गुन्हा आपण केला, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.त्यांनी २००९ मध्ये पाटणा साहिब येथून शेखर सुमन यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते मोठ्या मतांनी जिंकले होते. त्यानंतर २०१४ची निवडणूकही त्यांनी विजय मिळवला होता. शत्रुघ्न सिन्हा २८ वर्षे भाजपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी भाजप सोडून काँग्रेमध्ये प्रवेश केला आहे.
आ



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur