शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारची जुमलेबाजी- सचिन सावंत

spot_img

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारची जुमलेबाजी- सचिन सावंत

नागपूर: निवडणुका जवळ आल्या त्यामुळे स्वप्नांच्या व्योपारीने पुन्हा ‘जुमलेबाजी पार्ट-२‘ सुरू केली असून लोकांना फसवण्याची प्रक्रिया सुरू केली,पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली फसवी सन्मान योजना हा त्याचाच भाग असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेंटीचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी केले. ते सोमवार दि.२५ फेब्रुवारी रोजी नागपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते. या प्रसंगी मंचावर नागपूर शहर काँग्रेस कमेंटीचे अध्यक्ष विकास ठाकरे,अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार,संदेश सिंगल आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले,की कुणबी समाजाचा कालच नागपुरात महामेळावा पार पडला त्यात ‘७० रुपये दिवसाला देणारे मोदी सरकार शेतकऱ्यांना भिकारी समजतात का’ असा सूर उमटला, या योजनेमुळे विदर्भ- मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांचा कोणता फायदा झाला? असा प्रश त्यांनी उपस्थित केला.
विदर्भातील शेतकऱ्यांना हे सरकार सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नसल्याचे त्यांनी सांगितले. दुर्देवाने राज्याचे मुख्यमंत्री व एक केंद्रीय मंत्री विदर्भाचे,नागपूरचे असतानाही ही सन्मान योजना जाहीर झाल्यानंतर त्यांना जाणीव झाली नाही की या योजनेचा लाभ विदर्भाच्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी साढे सहा हजार कोटींची कर्ज माफी केली होती ज्याचा फायदा ५ एकरच्या वर असणाऱ्या शेतकऱ्यांना झाला असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे हे विधान ‘आम्ही राज्य सरकारकडुन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय’ ही देखील निव्वळ जुमलेबाजी असल्याचा आरोप सावंत यांनी केला. नाशिक मधून निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला तसेच विधिमंडळात दिलेली आश्वासने देखील मुख्यमंत्र्यांनी पाळली नाही. अर्थसंकल्पात ३४ हजार रुपयांची तूट असून ५ लाख कोटींचे कर्ज राज्यावर झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुका बघून ५०० रुपयांचे बोनस सरकार जाहीर करतेय याचा अर्थ ‘ जनतेची मते विकत घेण्याचा जनतेच्याच पैशाने प्रयत्न’ असल्याचा आरोप ,त्यांनी केला. सरकारच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो,असे ते म्हणाले. मेट्रोचा उल्लेख करीत इतक्या घाईने आरडीएसएस सुरक्षेचं प्रमाणपत्र कसे जाहीर करू शकते असा सवाल त्यांनी केला. निवडणुकीसाठी हे सरकार जनतेचा जीव धोक्यात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपने शहीदांचा अपमान केला-

या प्रसंगी शहरात लागलेले होर्डिंगसचा चांगलाच समाचार सावंत यांनी घेतला.पुलवामा घटनेवर शहरभर लागलेले’ खून का बदला पानी रोक के लिया’ या होर्डिंग्स विषयी बोलताना शहिदांचं रक्त सांडलं त्याचा बदला घेऊ शकता का? असा सवाल त्यांनी केला. पूर्वी ‘घर घर मोदी आता थरथर मोदी,डरडर मोदी झाला आहे’ अशी टीका त्यांनी केली. गडकरी यांनी पाणी रोखल्याची घोषणा ही देखील फसवी असल्याचे त्यांनी सांगितले. झालेल्या संधीप्रमाणे पाकिस्थानला त्यांच्या वाटेचे 80 टक्के पाणी पूर्ण मिळणार आहे,भारतातील २० टक्के पाण्यामधील ९९ टक्के पाणी बंधारे बांधून थांबवण्याची योजना पूर्वीपासुनच चर्चेत आहे मात्र या सरकारने लाज ,संवेदना सोडली असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. याची नोंद देश,राज्य आणि नागपुरातील नागरिक घेतील,असा इशाराही त्यांनी दिला. पुलवामावर सरकार जी काही भूमिका घेईल त्याच्या पाठीशी काँग्रेस व सर्व विरोधी पक्ष ठामपणे उभी राहील,मात्र सरकारने आधी भूमिका तर घ्यावी, पुलवामा घटना घडली तेव्हा सरकार शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेची तीव्रता फक्त त्यांच्या वक्तव्यातून जाणवते,कृती मध्ये दिसत नाही,असे ते म्हणाले.

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी १२ वर्ष काय केले?-
मोदी यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुणे हा निवडणूक स्टन्ट आहे, गुजरातच्या मुख्यमंत्री पदी १२ वर्षे असताना उच्च न्यायालयाला वारंवार मोदी सरकारला मैला डोक्यावर वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निर्देश द्यावे लागले. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ६४ हजार १९५ कामगार डोक्यावर मैला वाहत होते,आज त्यांचे पाय धुणे आठवले,त्यांची जुमलेबाजी जनतेला कळाली असल्याचे सावंत हे म्हणाले.

आंबेडकरांसाठी दरवाजे खुले-

एका प्रश्नाचे उत्तर देताना सावंत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी दरवाजे खुले असून चर्चा सुरू असल्याचे सांगितले. ,भाजप-संघाचा विमोड करायचा असेल तर तो काँग्रेस च्या नेतृत्वातच होऊ शकतो,नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी एकत्रित येण्याचे आव्हान सावंत यांनी केले. संघावर कारवाई करावी,आंबेडकरांच्या या मताशीही पक्ष सहमत आहे मात्र त्यांनी सांगावे,त्यांना कोणती कारवाई अपेक्षित आहे? जातीयवादी पक्षांशी आम्ही आघाडी करू शकत नाही,भाजप आणि एआयएम हे दोन्ही जातीयवादी पक्ष आहे असे आम्ही मानतो.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़