लोकसभा निवडणुकीची घोषणा जाहीर- ७ चरणांमध्ये मतदान

spot_img

लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. देशात यंदा 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. गेल्या वेळी 9 टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं.महाराष्ट्रात यंदा 4 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहेत. त्याच्या तारखा खालील प्रमाणे आहेत. गेल्या वेळी महाराष्ट्रात 3 टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं.देशात आचारसंहिता लागू झाली असून देशभरात पोस्टर-बॅनर उतरू लागलेत.

 महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकांचे वेळापत्रक :

मतदानाच्या ताऱखा आणि त्यापुढील कंसात मतदारसंघाची नावे पुढील प्रमाणे आहेत.

पहिला टप्पा- ११ एप्रिलला ७ जागांसाठी मतदान होणार आहे. (मतदारसंघांची नावे – वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर आणि यवतमाळ- वाशिम)

दुसरा टप्पा – १८ एप्रिलला १० जागांसाठी मतदान होणार आहे. (मतदारसंघांची नावे – बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर)

तिसरा टप्पा – २३ एप्रिलला १४ जागांसाठी मतदान होणार आहे. (जळगांव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदु्र्ग, कोल्हापूर, हातकणंगले)

चौथा टप्पा – २९ एप्रिलला १७ जागांसाठी मतदान होणार आहे. (मतदारसंघांची नावे – नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर, शिर्डी)

अँड्रॉईड अँप-

आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारीसाठी निवडणूक आयोगानं अँड्रॉईड अँपआणले आहे. या अँपवर तक्रार करताना तक्रारकर्त्यांना आपलं नाव, संपर्क क्रमांक सांगावा लागेल. तसंच तक्रारीनंतर 100 मिनिटांत काम केलं जाणार.

शिवाय सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रचारावर निवडणूक आयोगाची नजर असणार आहे. सोशल मीडियासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वं यंदा तयार करण्यात आली आहेत.

यंदा पहिल्यांदा सर्व मतदान केंद्रांवर VVPAT चा वापर केला जाणार, त्यामुळे सर्वांना आता त्यांनी दिलेल्या मताची खात्री करता येणार.

तसंच यंदा तब्बल 10 लाख मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

सध्याच्या 16व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपणार आहे. त्यामुळे त्याआधी 17 वी लोकसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे.

 

 

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़