
जैश हे पाकिस्तानी लष्कराचे अपत्य असल्याचे लष्कर प्रमुखांनी यावेळी सांगितले. असे हल्ले करणारे किती तरी गाझी आले आणि गेले. मात्र, या सर्वांचा आम्ही खात्मा केल्याचे लष्कर प्रमुखांनी म्हटले. बंदूक उचलेल्या तरुणांनी माघारी परतावे नाहीतर ठार मारू, असा इशाराच यावेळी लष्कराने दिला.
काश्मीर खोऱ्यातील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवादाच्या मार्गाने भरकटलेल्या तरुणाईने आत्मसमर्पण केले नाही तर आम्ही त्यांना ठार मारू, असे कनवालजीत सिंग धिल्लान यांनी सांगितले. लष्कराने प्रत्युत्तरात राबवलेल्या मोहिमेत पाच जवानांना वीरमरण आले. तसेच जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे ते म्हणाले. यात पुलवामा आत्मघातकी बॉम्बहल्ल्याचा मुख्य सूत्रधार कामरानचाही समावेश असल्याचे ते म्हणाले. आत्मघातकी हल्ला करणाऱ्या आदिल अहमद दारला त्यानेच प्रशिक्षण दिले होते.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur