
नागपूर: शहरात नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवेला सुरवात होणार असल्याने सजावटीचे कार्य देखील वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. ट्रान्सफॉर्मिंग नागपूर आता खऱ्या अर्थाने दृष्टीपथास यायला लागले आहे. रिच-१ कॉरिडोर अंतर्गत वर्धा मार्गवरील खापरी ते सीताबर्डीपर्यन्त मेट्रोमार्गाशी संबंधित पिलर, व्हायाडक्त, ट्रॅक, ई. सर्व महत्वाचे कार्य पूर्ण झाले असून आता यामार्गावर रस्त्याचे बांधकाम आणि सौंदर्यीकरण करण्यास सुरवात झाली आहे. मेट्रो अधिकाऱ्यांच्या देखरेखीत संपूर्ण कार्य केले जात आहे.
उल्लेखनीय आहे कि, रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी रिच-१ मार्गावरील रस्त्यांवर होत असलेले कार्य पूर्ण होताच त्याठिकाणचे बॅरिकेट्स काढण्यात येत आहे. जेणेकरून वाहनचालकांना पूर्ववत मोकळा मार्ग उपलब्ध होऊ शकेल. बॅरिकेट्स हटवताच रस्त्यावरची संपूर्ण जागा नीटनेटकी करण्यात येते. फुटपाथ तयार केले जात आहे. तसेच परिसरातील सौंदर्यीकरण वाढविण्यासाठी उपलब्ध जागेवर झाडे लावण्यात येत आहे. रंगरोटीचे कार्य देखील युद्धस्तरावर पूर्ण केले जात आहे.
व्हायाडक्तवर दोन्ही बाजूने स्टील रेलिंग लावण्यात आली आहे. मुख्यम्हणजे या रेलिंगवर माझी मेट्रो नाव लिहण्यात आले आहे. स्टील रेलिंगमुळे व्हायाडक्त मेट्रोमार्ग दिसायलाही आकर्षक दिसत आहे. नागपूरकरांना माझी मेट्रोविषयी नेहमी अभिमान वाटावा त्यादिशेने महा मेट्रो स्तरावर कार्य करीत आहेत. कार्य दरम्यान नागरिकांतर्फे मिळत असलेल्या सहकार्याबद्दल महा मेट्रो नेहमीच कृतद्न्य आहे.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur