बनावट कागदपत्रे; घराची विक्री

spot_img
नागपूर. बजाजनगर परिसरातील पहन क्रमांक 44, खसरा क्रमांक -108/2, 108/3 वरिल भूखंड क्रमांक – 13 येथील दुमंजली घराचे बनावट कागदपत्रांच्या आधारावर एका 55 वर्षीय इसमाला जवळपास 60 लाखांचा चूना लावल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी अमित परमेश्वर धुपे (38, रा़  रडके ले-आऊट) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरमपेठ, खरे टाऊन परिसरात राहणारे फिर्यादी श्याम काशीप्रसाद बोरोले (55) यांनी साक्षीदारासोबत एप्रिल 2015 साली बजाजनगर परिसरातील पहन क्रमांक 44, खसरा क्रमांक -108/2, 108/3 वरिल भूखंड क्रमांक – 13 येथील दुमंजली घराचा आरोपीशी 59 लाख 75 हजार रुपयांत सौदा केला होता. मात्र, पैसे घेतल्यानंतरही आरोपीने सदर घराचे बनावट विक्रीपत्र तयार करून रामभाऊ भूसारे यांना विकली. अश्या प्रकारे आरोपीने फिर्यादींची फसवणूक केल्यानंतर त्यांनी बजाजनगर ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. 
—————

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़