बँकेची बोगस गॅरंटी नावे 25 लाखांचा चूना
नागपूर. बजाजनगरातील एका शासकीय कंत्राटदाराला बँक गॅरंटी तयार करून देतो अशी बतावणी करून एका शासकीय कंत्राटदाराला 25 लाखांची चपत लावल्याचा प्रकार कोराडी ठाण्याअंतर्गत उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी कोलकाता येथील आयसीआयसीआय बँकेच्या शकुंतला पार्क शाखेच्या व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सगंनिग रॉय असे बँक व्यवस्थापकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ येथे राहणारे मनोज बंसीलाल बियानी (46) हे शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांचे कोराडी नाका येथील हेमकुंड हिरो होंडा शोरूमजवळ बी. सी. बियानी प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीचे कार्यालय आहे. काही महिन्यांपूर्वी कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या तलावाचे खोलीकरण करण्याची निविदा निघाली होती. हे काम 15 कोटी 50 लाख 64 हजारांचे होते. बियानी यांनी निविदेत भाग घेतला होता. त्यासाठी बँक गॅरंटीची आवश्यकता होती. बियानी यांच्या ओळखीचे सल्लागार श्रीहरी तलाशिया यांनी अडिच कोटींची बँक गॅरंटी बनवून देतो असे सांगून 25 लाखांची मागणी केली. बियानी यांनी 25 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. बँक गॅरंटी बनविण्यासाठी तलाशिया यांच्या माध्यमातून बँक व्यवस्थापक सगंनिग रॉय यांना 25 लाख रुपये दिले. रॉय यांनी पैसे घेऊन देखील बँग गॅरंटीचे बनावट कागदपत्र तयार करून बियानी यांना दिले आणि त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी बियानी यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur