
भुपेंद्र गणवीर
निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्याबरोबर देशभर निवडणुकीचे पडघम वाजू लागले. राष्ट्रवादाचा उदोउदो करीत निवडणूक जिंकण्याचफासे पडू लागले. यात भाजपा आघाडीवर आहे. हा राष्ट्रवाद मुखवटाधारी आहे. नकली आहे. देशात उपासमार आहे. जातपात आहे.कुपोषण आहे.गरीबी आहे. महागडे शिक्षण आहे.खेड्यांमध्ये शिक्षणाच्या सोयींचा अभाव आहे.शेतकरी आत्महत्या आहेत. प्रचंड बेकारी आहे. यात 80 टक्के भरडली जात आहे.या जनतेचे अकल्याण म्हणजे राष्ट्रवाद होय काय? सरकारच्या चुकीने पुलवामामध्ये 44 जवान शहीद झाले.त्याचा बदला म्हणजे एअर स्ट्राईक होय. ही कारवाई म्हणजे राष्ट्रवाद होय. हा भाजपचा सोईचा राष्ट्रवाद आहे. अच्छे दिन आनेवाले है. या सारख्या घोषणांवर मोदी सरकार सत्तेवर आले. या सरकारच्या काळात पाकिस्थान सोबत अनेक चकमकी झाल्या. उरी, पठाणकोटही घडले. तेव्हा राष्ट्रवाद नाही आठवला. आता निवडणुका असल्याने सारे आठवत आहे. एअर स्ट्राईक कारवाई म्हणजे राष्ट्रवाद हे देशातील रंजल्या-गाजल्यांना मान्य नाही.ही शुध्द बनवाबनवी आहे.
या देश अंधश्रध्दा,दैवीवाद,जातीवादाने पोखरला आहे. सर्जिकल स्ट्राईक त्यावर करा.यावर मात करणे खरा राष्ट्रवाद ठरेल. अंधश्रदा व दैवीशक्तीँच्या मागे लागून अनेकांचे आयुष्य बर्बाद होत आहेत.कोट्यवधी श्रमतासांची नासाडी होत आहे. श्रध्येच्या नावावर महिलांना दुजाभावाची वागणुक मिळते. सबरीमाला मंदीर त्याचे उदाहरण आहे.न्यायालयाच्या निवाड्यानंतरही समतेत आडकाठी आणली जाते. अशा पोकळ राष्ट्रवादाला ठोकर हवी. सर्व भेद संपावेत. ते मग जातीचे असो की स्त्री-पुरुष भेद असोत.समता,बंधुता व न्यायाचे राज्य हवे. तेव्हाच खरा राष्ट्रवाद येईल. त्याचा अभिमान राहील.
go



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur