|
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर शहरात ‘हाय-अलर्ट’
– संवेदनशिल ठिकाणावर चोख बंदोबस्त
नागपूर. पुलवाममध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्यानंतर शहर पोलिसांनी ‘हाय अलर्ट’ घोषीत केले. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्य सरकारने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार शहरातील विविध भागांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
यासंदर्भात सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्तांनी आज वरिष्ट अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. प्रत्येक लॉज व हॉटेलची झडती घेण्यात आली असून पार्किंगमधील वाहनांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. याशिवाय नाक्यांवरही वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. दीक्षाभूमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, भारतरत्न डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्थानकावरही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बॉम्बशोधक तसेच श्वानपथकाद्वारे रेल्वेस्थानकावर तपासणी करण्यात येत आहे. शहर पोलिस विभागाकडून जागोजागी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून काही अतिसंवेदनशील परिसरात शस्त्रधारी जवान तैनात करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांचे सायबर सेलही सक्रिय झाले आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र, कमेंट टाकणाऱ्यांवर त्यांचे बारीक लक्ष राहणार आहे. पोलिसांनी सायबर कॅफेवरही नजर ठेवली आहे. तसेच सेकंड हॅण्ड दुचाकी व चारचाकी विक्रेत्यांसह सायकल दुकानदारांकडेही पोलिसांची नजर राहणार आहे.
-संशयितांच्या हालचालींवर लक्ष
शहरातील बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशन, यासह रस्ता मार्गा शहरात दाखल होणाऱ्या संशयितांच्या प्रत्येक हालचालींसह त्यांच्या सामानावरही पोलिसांनी आपले लक्ष केंद्रीत केले असून जागोजागी नाकाबंदी लावण्यात आली आहे. पार्किंगस्थळासह सर्व मॉल, मोठी बाजारपेठेतील दुकाने, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, मोठी प्रतिष्ठाने, शासकीय अशासकीय कार्यालयांना सीसीटीव्ही लावण्याच्या तर काहींना दुरुस्तीच्या तर काहींना त्याद्वारे प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस संवेदनशील वसाहतींवर विशेष लक्ष ठेवून आहे. कोणतेही संश्यास्पद वस्तू अथवा व्यक्ती दिसल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिस नियंत्रण कक्ष अथवा संबंधीत पोलिस स्टेशनला माहिती द्यावी असे आवाहन नागपूर शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
– विमानतळावर वाढली सतर्कता
पुलवामातील भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला. विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘सीआयएसएफ’चे जवान डोळ्यात तेल घालून सुरक्षेबाबत सजग असल्याचे सूत्रांनी सांगितले.
-रेल्वेस्थानकावर अतिरिक्त सुरक्षा
पुलवामामध्ये दुपारला झालेल्या दहशतवादी हल्लयामुळे केंद्र गृह विभागाच्यावतीने मध्य रेल्वेच्या सर्वच विभागांनाहाय अलर्ट जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे गुरुवारी दुपारपासून नागपूर रेल्वेस्थानकावर कडक बंदोबस्त लावण्यात आला. यात श्वानपथक आणि बीडीडीएसच्या पथकाद्वारे नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीची कसून तपासणी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांचा तगडा बंदोबस्त नागपूर रेल्वेस्थानकावर लावण्यात आला. श्वानपथकासह बॉम्बशोधक आणि नाशक पथकाद्वारे नागपूरातून ये-जा करणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीची कसून तपासणी करण्यात आली. दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रत्येक रेल्वेगाडीची तपासणी करण्यात आली. परंतु पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. हजारो गाड्यांची ये-जा होणाऱ्या नागपुर स्थानकावर सर्वांचे लक्ष आहे. यापूर्वी मुंबई दहशतवादी हल्ल्यासह इतर घटना रेल्वे स्थानकावर घडल्याचे समोर आले आहे. वर्दळ असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावर एवढ्या गर्दीचा फायदा आतंकवादी सहज घेऊ शकतात. ही भीतीही सुरक्षा यंत्रणेला माहिती आहे. त्यामुळे गुरुवारी डोळ्यात तेल घालून रेल्वेस्थानकाचा काना-कोपरा पिंजून काढण्यात आला हे विशेष.
—————–
|
|
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर शहरात ‘हाय-अलर्ट’
Youtube वीडियोस
1
/
205
मा.रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक विभागाचे मंत्री#सामाजिक मुद्द्यांवर पत्रकारांशी चर्चा
आदिवासी विद्यार्थ्यांचा आदिवासी विकास विभागावर धडक मोर्चा#विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्या
ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी आदिवासी समाजाच्या ज्वलंत मुद्यांवर चर्चा करण्यास ऑफरोट संघटनेला भेट दिली
नागपूर मे बादल गरजे#आधी तुफान के साथ आई बारिश#short#video#viral#
कोराडी प्लांट#लाखो लोकांच्या जीवावर उठले#विषारी धुराचा सतत स्त्राव हवेत पसरत आहे#short#video#viral#
थाला पती विजय के ऐतिहासिक जीत के बाद#तामिळनाडू के मुख्यमंत्री बने विजय थालापती#
1
/
205



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur