पत्रकार संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

spot_img

नागपूर: नागपुरातील महिला पत्रकार सरिता कौशिक यांना राहुल गांधी यांच्या नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या जाहीर सभेच्या वार्तांकनावरून मानत आकस ठेऊन काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी असभ्य भाषेत वर्तवणूक दिली. त्यासोबतच सोशल मिडियावरही ट्रोलिंग केले. त्यासोबतच इतरही इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकारांबद्दल त्यांनी असभ्य भाषेचा प्रयोग केला. याची नागपूर श्रमिक पत्रकार संघ,महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ,टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि नागपूर प्रेस क्लब यांनी गंभीर दखल घेऊन निषेधाचे पत्रक प्रसिद्ध केले होते.

सोमवारी त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांकडे निवेदन सोपवले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रकार संघाच्या पफधिकाऱ्यांना कारवाईचे आश्वासन दिले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़