नागपूर श्रमिक पत्रकार संघाकडून नाना पटोले समर्थकांचा निषेध

spot_img

नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचे समर्थक असलेले काही नेते व कार्यकर्ते सोशल मीडियावर पत्रकारांना धमक्या देत आहेत. या कृतीचा नागपूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व नागपूर प्रेस क्लब यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचे समर्थक असलेले काही नेते व कार्यकर्ते सोशल मीडियावर पत्रकारांना धमक्या देत आहेत. तसेच, त्यांना बदनामीकारक शिवीगाळही केली जात आहे. या कृतीचा नागपूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व नागपूर प्रेस क्लब यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
पत्रकार सरिता कौशिक, रजत वशिष्ठ, रश्मी पुराणिक व राजीव खांडेकर यांना पटोले समर्थकांनी आतापर्यंत लक्ष्य केले. पटोले व त्यांच्या समर्थकांचे पत्रकारांसोबतचे हे वागणे अव्यवहार्य आहे. पत्रकार नागरिकांपुढे सत्य बाजू मांडत असतात. पत्रकार अशा कृतीला कधीच घाबरत नाहीत. ते आपल्या कर्तव्यांना सतत न्याय देत राहतील. प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्याला नुकसान पोहचविण्याचे काम पटोले समर्थक करीत आहे. त्यांची कृती फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे पटोले व त्यांच्या समर्थकांनी तात्काळ पत्रकारांची माफी मागावी. तसेच, पोलिसांनी दोषी समर्थकांचा शोध घेऊन त्यांना दंडित करावे व पत्रकारांची बदनामी करणारी खोटी छायाचित्रे प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ व नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर व महासचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़