
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील राजकारण चांगलेच गाजत आहे. आधी विशाल मुत्तेमवार यांचे नाव घोषित होवून ते मागे पडले. आता विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर झाली. अशोक चव्हाण शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांच्यासाठी आग्रही होते. त्यांनी काँग्रेस प्रवेशासाठी आमदारकी आणि पक्षाचा राजीनामा दिला.
कोणाच्याही ध्यानी मनी नसताना मूळ नागपूरकर विशाल मुत्तेमवार यांचे नाव चंद्रपूर मतदारसंघासाठी घोषित झाले मात्र त्यांच्या पेढ्याचा गोडवा लवकरच विरघळा, त्यांच्या नावाला स्थानिक कार्यकर्त्यांकडून विरोध होताच विशाल मुत्तेमवारांनी स्वतःहून माघार घेतली. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी शिवसेनेचे आमदार धानोरकर यांना राजीनामा द्यायला सांगितला, धानोरकर यांनी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देऊनही विनायक बांगडे यांना उमेदवारी घोषित झाली.परिणामी सध्यातरी धानोरकरांची स्तिथी बिकट आहे.ना इकडचे राहिले ना तिकडचे. याच घडामोडीवर नाराज चव्हाण यांनी एका कार्यकर्ता कडे ‘मलाच राजीनामा द्यावासा वाटतोय’ अशी हतबलता व्यक्त केली. ज्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला. चव्हाण यांच्या सांगण्यावरून धानोरकर यांनी राजीनामा दिला होता. मात्र ते उमेदवारी देवू शकले नाही. त्यामुळे माझे कुणीच ऐकायला तयार नाही. त्यामुळे मलाच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावासा वाटत आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही बांगडे यांच्या उमेदवारीबाबत पक्ष नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.पाच वर्षे कामे करूनही,उमेदवारी देताना विश्वासात घेतले नसल्याची त्यांची खंत आहे.पक्षाला जिंकण्याची संधी असताना कमकुवत उमेदवार देऊन भाजपच्या झोळीत जागा दान दिली असल्याची खदखद कार्यकर्ते व्यक्त करतात आहेत. बांगडे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. एका कार्यकर्त्याशी बोलताना त्यांनी आपलीच मानसिकता राजीनामा देण्याची असल्याचे सांगितले. या संभाषणाची क्लिप सध्या समाज माध्यमावर चांगलीच वायरल होत आहे.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur