देशात ३१ कोटी तरुण बेरोजगार हा कसला विकास? सुरेश माने

spot_img

 

नागपूर: २०१४ च्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने विकासाचा नारा दिला होता. वास्तव बघितल्यास गेल्या पाच वर्षात सीमेवर सर्वात जास्त सैनिक शहीद झाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या भाजपच्या काळातही थांबल्या नाहीत. केंद्र असो किवा राज्य कर्जाचा बाेजा प्रचंड वाढला आहे. ९० टक्के रक्कम कर्जावरील व्याजाची परतफेड करण्यातच खर्ची होते मग विकास कामांसाठी भाजप पैसा कुठुन आणतो? राज्याची वित्तीय तूट ६० हजार कोटी ऐवढी असताना मोठमोठे भांडवली प्रकल्पाला पैसा कसा पुरवणार? मार्च २०१७-२०१८ साली देशातील विविध बँकाचा सव्वा तीन कोटी रुपये कर्जदारांनी बुडवले तर मार्च २०१८ मध्ये हाच आकडा १० लाख ३५ हजार कोटींवर पोहोचला. पसा बुडवणा र्यां कोणाचा आर्शिवाद आहे? देशातील ३१ कोटी तरुण हे बेरोजगार आहेत, ३६ रोजगार केंद्रात ४८ लाख सुशिक्षितांनी नोंद केली आहे मग विकास नेमका झाला कोणाचा? असा प्रश्‍न विदर्भ निर्माण महामंच व बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे उमेदवार सुरेश माने यांनी केला. गुरुवार दि.२८ मार्च रोजी सिव्हील लाईन्स येथील प्रेस क्लब येथे आयोजित पत्र-परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर चंद्रपूरचे बीआरएसपीचे उमेदवार दशरथ मडावी, विदर्भ महामंचचे डॉ.देवेंद्र वानखेडे, अरुण केदार,सुनील चोखारे, प्रा.रमेश पिसे उपस्थित होते.
पुढे बोलताना माने म्हणाले,की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी देखील ७२ हजार रोजगार देण्याची घोषणा फसवी आहे. केंद्रातील असो किवा राज्यातील हे सरकार फसवे, धूर्तपणाचे असून रोजगार,महागाई, अर्थव्यवस्था, घटनात्मक स्वायत्तेला तोंड देऊ शकत नाही म्हणून पाकिस्तानसोबत युद्धजन्य परिस्थितीवर मत मागत आहेत. या सर्व फसवेगिरीत नागपूरातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे देखील बरोबरीचे भागीदार असून या सर्व अपयशामध्ये त्यांची देखील संयुक्त जबाबदारी असल्याचा आरोप माने यांनी केला. देशात १८ मोठी व १८० लहान-मोठी बंदरं आहेत जे देशाच्या दृष्टिने सुरक्षित असणे खूप गरजेचे आहे मात्र केंद्रातील जहाज बांधणी मंत्री गडकरी यांनी बंदराजवळील जमीन खाजगीकरणाच्या नावावर भांडवलदारांच्या घशात घालून दिला असल्याचे ते म्हणाले. कॅगच्या अहवालातच उल्लेख आहे देशात जेवढ्या आर्थिक वित्तीय संस्था आहेत त्यात भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढले आहे. संसेदत स्वत: अर्थमंत्री जेटली यांनी कबूली दिली आहे,या अपयशात गडकरी यांचा हिस्सा नाही का? विदर्भाच्या प्रश्‍नावर शहा,मोदी,गडकरी हे शिवसेनेच्या दबावाला बळी पडलेत मग ५६ इंची छाती कशी? अश्‍या स्वरुपाचे विश्‍वासघातकी राजकारणीने नागपूर शहराचे प्रतिनिधत्व करावे का? याचा निर्णय आता नागपूरकर मतदारांना करायचे असल्याचे माने हे म्हणाले. नागपूरात अद्याप ही ४०० झोपडपट्ट्या असून अनेक प्रभागात अजूनह टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे, हीच का गडकरी यांची ‘स्मार्ट सिटी’ची घोषणा, नुसत्या घोषणा करुन मते लुबाडणे ही ‘राजकीय दरोडेखोरी’ असल्याचा आरोप त्यांनी केला. मी एकूण चार पत्र-परिषदा घेणार असून पुढील पत्र परिषद ही काँग्रेसच्या उमेदवारावर, तिसरी पत्र परिषद इतर उमेदवार तर चौथी पत्र परिषद नागपूरचा विकास कोणी,कितपत केला? यावर घेणार असल्याचा खुलास त्यांनी केला.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़