
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली होती. आज देशभरातील २० राज्यातील ९१ मतदारसंघात हे मतदान पार पडले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ७ मतदारसंघात आज मतदान पार पडले. यात मणिपूरमध्ये सर्वात जास्त ७८.२० टक्के तर बिहारमध्ये सर्वात कमी ५०.२६ टक्के मतदान झाले.
मतदानाची टक्केवारी –बिहार – ५०.२६ टक्के,तेलंगणा – 60.57टक्के,मेघालय – 62टक्के,उत्तर प्रदेश – 59.77टक्के,मणिपूर – 78.20टक्के,लक्षद्विप – 65.9टक्के,आसाम – 68टक्के
महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, जम्मू काश्मिर, मनिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, लक्षद्विप या ठिकाणी मतदान झाले.
दुपारी ३ वाजेपर्यंत आंध्र प्रदेश आणि सिक्किममध्ये ५५ टक्के तर अरुणाचलमध्ये ५०.८७ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये ४६.१७ टक्के तर महाराष्ट्रात ४६.१३ टक्के मतदान. उत्तराखंडमध्ये पाच मतदारसंघात ४१.२७ टक्के, बिहारमध्ये ३४.६० टक्के, जम्मू काश्मिरमध्ये ३५.५२ टक्के, सिक्कीममध्ये ३९.०८ टक्के, मिझोराममध्ये ४६.५ टक्के मतदान झाले.
वायएसआर काँग्रेसच्या हल्ल्यात जखमी झालेला तेलगू देसमचा नेता शिद्दा भास्कर रेड्डी यांचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशमध्ये मतदानाला रक्तरंजीत वळण लागले, वायएसआर काँग्रेसच्या हल्ल्यात देलगू देसमचा नेता गंभीर जखमी. अनंतपूर जिल्ह्यातील थडी पाथरीची घटना जनसेना पक्षाचे नेते आणि अभिनेते पवन कल्याण यांनी विजयवाडा येथे मतदान केले. गडचिरोलीतील एटापल्ली येथे नक्षलवाद्यांकडून स्फोट मात्र कोणतीही जीवीत हानी नाही.
आतापर्यंत नागालँडमध्ये ४२ टक्के, जम्मू काश्मिरमध्ये २४.६६ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ३८ टक्के, त्रिपुरात २६.५ टक्के, तेलंगणात २२.८४ टक्के, उत्तराखंडमध्ये २३.७८ टक्के, मेघालयमध्ये २७ टक्के, लक्षद्विपमध्ये २३.१० टक्के, तर महाराष्ट्रात १३.७ टक्के मतदान झाले. ज्या मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला, तिथे पुनर्मतदान घेण्यात यावे. अशी मागणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. मशीनमध्ये बिघाड झाल्यावर घरी परतलेले मतदार नंतर परत आले असतील याबद्दल त्यांना शंका आहे. यासंबंधी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी दिबरुगड येथील केंद्रावर मतदान केले, छत्तीसगडमधील दंतेवाडात मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. ९ एप्रिलला भाजप आमदार भीमा मांडवी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. मुझफ्फरपूर येथील मतदान केंद्रावर एकही मतदान पडले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपुरात आपल्या कुटुंबासह मतदान केले. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी हैदराबादमध्ये मतदान केले. सकाळी ९ वाजेपर्यंत लक्षद्विपमध्ये ९.८३, तेलंगणात १०.६ टक्के, अंदमान आणि नकोबारमध्ये ५.८३ टक्के, आसाम आणि अरुणाचलमध्ये १३.३ टक्के मतदान झाले.
देशभरातील ९१ मतदारसंघात अनेक दिग्गज नेत्यांचा आज फैसला होणार आहे. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्ही. के. सिंह, हंसराज अहीर, किरण रिजीजू, काँग्रेसच्या रेणुका चौधरी, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, रालोद नेते अजित सिंह, जयंत चौधरी, बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांचा समावेश आहे.
9ः



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur