दुर्बल घटक समिती तपासणार मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांची गुणवत्ता स्वतंत्र अभियंता नेमणार : सभापती हरिश दिकोंडवार यांचे निर्देश

spot_img

नागपूर, ता. १२ : मागासवर्गीय व दुर्बल घटकांच्या वस्त्यांमध्ये होत असलेल्या कामांवर मनपाची दुर्बल घटक समिती यापुढे स्वत: लक्ष ठेवणार आहे. या वस्त्यांमधील कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र अभियंता नेमण्याचे निर्देश समितीचे सभापती हरिश दिकोंडवार यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या दुर्बल घटक समितीची बैठक डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी (ता. १५) पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला सभापती हरिश दिकोंडवार यांच्यासह समितीचे सदस्य परसराम मानवटकर, निरंजना पाटील, वंदना भगत, शकुंतला पारवे, राजेंद्र सोनकुसरे, कांता रारोकर, कार्यकारी अभियंता राजेंद्र राहाटे उपस्थित होते. सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दुर्बल घटक निधीअंतर्गत जी कामे प्रलंबित आहेत, त्या कामांचे कार्यादेश तातडीने काढण्याचे निर्देशही सभापती हरिश दिकोंडवार यांनी दिले.

आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्याकरिता यंदाच्या नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तीन कोटींची तरतूद करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मागासवर्गीय वस्त्यांमधील महिला, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध मार्गदर्शक शिबिरांचे आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येतील. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करून नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी दुर्बल घटक समितीच्या शीर्षाखाली स्वतंत्र तीन कोटींची तरतूद करण्याचे निर्देशही सभापती हरिश दिकोंडवार यांनी दिले.

आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार आता दुर्बल घटक समितीच्या निधीतही ३० टक्के कपात होणार आहे. मात्र, विशेष बाब म्हणून या समितीच्या निधीतील कपातीचा निर्णय शिथील करण्यात यावा, या आशयाचे निवेदन महापौर आणि आयुक्तांना दिले असल्याची माहिती सभापतींनी दिली.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़