डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

spot_img

पुणे : महा  मेट्रोचे व्यवसथापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याविरोधात शहरातील डेक्कन पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महा मेट्रोच्यावतीनेआचार संहिता लागू झाल्यावर पुणे मेट्रोचे काम पूर्ण होऊन डिसमेंबरपर्यंत मेट्रो सुरु होईल अशी घोषणा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या दीक्षित यांनी दिली आहे. यामध्ये पहिला टप्प्यात असलेल्या वनाज ते डेक्कनपर्यंतची मेट्रो धावेल असेही त्यांनी म्हटले होते.ही घोषणा आचारसंहिता भंग करते असे आचारसंहिता कक्षाचे मत झाले. त्यांच्यानुसार महसूल विभागाने फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या गुन्ह्यात 1 महिना शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे त्यात अटक होत नाही. या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी दिली.

 

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़