
कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत वडक्कन यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या देशावर हल्ला केला तेव्हा माझ्या पक्षाने दिलेली प्रतिक्रिया दु:ख देणारी होती. त्यामुळे मी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला. या घटनेने मला अतिव दु:ख झाले. जर एखादा राजकीय पक्ष देशविरोधात निर्णय घेत असेल तर मला तो पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही, असे वडक्कन यांनी सांगितले. वडक्कन यांच्या भाजप प्रवेशावर काँग्रेसने दु:ख व्यक्त केले आहे. वडक्कन यांना शुभेच्छा. त्यांच्या भाजपमध्ये जाण्याचे दु:ख आहे. त्याठिकाणी त्यांच्या इच्छा पूर्ण होतील, अशी आशा आहे, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
तृणमूल काँग्रेसचे आमदार अर्जुन सिंह हेही भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी मुकुल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. जी टीएमसी ‘माँ, माटी,मानुष’च्या तत्त्वज्ञानावर चालत होती, त्याच टीएमसीत आता ‘मनी’ (पैसा) विषयी बोलले जाते, असे अर्जुन सिंह यांनी म्हटले आहे. सिंह यांना बैरकपूरमधून लोकसभेसाठी उमेदवारी हवी होती. मात्र, याठिकाणी ममतांनी दिनेश त्रिवेदी यांना संधी दिल्याने नाराज झालेले सिंह यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur