
नागपूर: 22 मार्च संपूर्ण विश्वभरात जल दिवस म्हणून साजरा केला जातो. 1992 मध्ये ब्राझिल येथे आयोजित United Nations Conference on Environment and Development च्या दरम्यान जल संरक्षणाच्या महत्त्वावर विस्तारित चर्चा केली गेली तसेच 1993 पासून प्रत्येक वर्षी22 मार्च विश्व जल दिवसच्या रुपात साजरा केला जातो आहे.
ग्रीन विजिल संस्था ने फुटाळा तलाव परिसरात जनजागरणाच्या माधयमातून विश्व जल दिवस साजरा केला. या अभियानाच्या अंतर्गत ग्रीन विजिल संस्थेच्या सदस्यांनी पाण्याचे महत्व व संरक्षणाची गरज यावर चर्चा केली. अभियाना दरम्यान विभिन्न पोस्टर्स व बैनर च्या माध्यमातूनजल संरक्षणाचे संदेश दिले गेले. संस्थेच्या सदस्यांनी नागरिकांना नागपुर वर येणाऱ्या जलसंकटाबद्दल अवगत केले तसेच अधिकाधिक प्रमाणात पाणी वाचविण्याचा अनुरोध केला. याच दरम्यान संस्थेच्या सदस्यांनी नागरिकांनाpH (आम्लीय / क्षार), Turbidity (धूसरपणा), Temperature आणि Dissolved Oxygen (पाण्यातमिसळलेल्या ऑक्सीजन ची मात्रा) इत्यादी पाण्याच्या शुद्धतेच्या मापदंडांचे परिक्षण करुन दाखविले.
ग्रीन विजिल ची टीम लीड सुरभि जैस्वाल यांनी सांगितले की, या वर्षी ची जल दिवसाची थीम “Water for All, Leaving no one behind” आहे ज्याचा उद्देश्य आहे, पृथ्वी वर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला पाणी मिळाले पाहिजे, शुद्ध प्यायच्या पाण्याचा हक्क सगळ्यांचा आहे.
अभियानाला यशस्वी बनवण्याकरिता कौस्तभ चॅटर्जी, सुरभिजैस्वाल, कल्याणी वैद्य, बिष्नुदेव यादव, मधुसुदन चॅटर्जी, शीतल चौधरी, विकाश यादव, कार्तिकी कावळे, कल्याणचौधरी, दादाराव मोहोड़, नितिन कुकेकर, रजत जैस्वाल, रुचीसोनी इत्यादींनी अथक परिश्रम केले.