गोव्यात प्रमोद सावंत मुख्यमंत्री: पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री

spot_img

पणजी : गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर बऱ्याच खलबता नंतर अखेर प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.  प्रमोद सावंत हे अखेर खुर्चीवर बसतील हे सोमवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर स्पष्ट झाले. मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई या दोघा आमदारांना उपमुख्यमंत्री पद देण्यास भारतीय जनता पक्ष तयार झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गोव्यात असून त्यांच्यासोबत सोमवारीच सायंकाळी सात वाजेर्पयत ढवळीकर व सरदेसाई यांची बैठक होणार आहे.
 प्रमोद सावंत हे भाजप पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. प्रमोद सावंत हे दोनवेळा साखळी मतदारसंघातून निवडून आले. काँग्रेसमधून जे नेते गेल्या वर्षभरात भाजपमध्ये आले, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही असे भाजपने ठरवले होते. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधी मंत्री झाले नव्हते. तथापि, त्यांना आता थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळणार आहे. मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही घटक पक्षांनी उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. ते देण्यास भाजप ब:याच चर्चेनंतर तयार झाला. मगोपकडे तीन आमदार असून त्या तिघांनाही नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल. गोवा फॉरवर्डच्याही तिघा आमदारांना मंत्रीपद मिळेल, असे भाजपच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. पर्रीकर सरकारमध्ये मगोपचे फक्त दोघेच मंत्री होते.  भाजपशी संघर्ष केला तर गोवा विधानसभा निलंबित केली जाण्याची शक्यता होती. विरोधी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला तरी, त्या पक्षाला सरकार स्थापन करू देण्यास भाजप कधीच तयार होणार नाही याची कल्पना मगोप व गोवा फॉरवर्डलाही आली.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़