
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरयांचे निधन झाले आहे. शनिवारपासूनच त्यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या होत्या. मात्र, ही अफवा आता खरी ठरली आहे. आज पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, सकाळी त्यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते. मनोहर पर्रीकर यांना भेटण्यासाठी सहा मंत्री- आमदार त्यांच्या निवासस्थानी गेले होते. पण, ते प्रत्यक्ष मनोहर पर्रीकर यांना भेटू शकले नाहीत. मनोहर पर्रीकर त्यांच्यासोबत बोलण्याच्या स्थितीत नव्हते.
मनोहर पर्रीकर यांना झोपूनच रहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. शनिवारी सायंकाळी त्यांची स्थिती सुधारली पण चिंताजनक होती. गेल्या, कित्येक दिवसांपासून या नेत्याची मृत्युशी झुंज शेवटी अपयशी ठरली. दरम्यान, पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री आणि मोदी सरकार मध्ये संरक्षण मंत्री राहिले आहेत,त्यांच्या निधनाने ‘गोवा अंधारात बुडाला’ अशी मान्यवरांची प्रतिक्रिया येत आहे.
६४ वर्षीय पर्रीकर शेवट पर्यंत ‘how is the Josh’ असंच जगणं जगलेत. एक खरा माणूस आणि खरा नेता म्हणून त्यांची छवि होती, सगळ्याच पक्षात त्यांच्यावर प्रेम करणारी आणि आदर करणारी मंडळी आहे,त्यांच्या जाण्यानं देशाचे खूप मोठे नुकसान झाले,असं मान्यवर म्हणाले.

‘देश कधीही तुमचं योगदान विसरणार नाही’, राष्ट्रपतींकडून पर्रीकरांना श्रद्धांजली
पणजी : गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते यांचे आज संध्याकाळी निधन झाले. पर्रीकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. पर्रीकर यांच्या निधनाने देशात दुखवटासदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘देश के सच्चे सपूत को खोया’ अशी श्रद्धांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या जात होत्या. मात्र, ही अफवा आता खरी ठरली आहे. आज पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, सकाळी मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते. पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी आता भाजपने तयारी सुरू केली आहे.

भाजपाने सच्चा कार्यकर्ता आणि श्रेष्ठ नेता गमावला-रावसाहेब पाटील दानवे
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीने एक सच्चा कार्यकर्ता आणि श्रेष्ठ नेता गमावला आहे, अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी रविवारी श्रद्धांजली अर्पण केली.
खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, मनोहर पर्रिकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गोव्यात भाजपाची उभारणी केली व पक्षाला सत्तेवर आणले. त्यांनी गोव्याला राजकीय स्थैर्य दिले आणि स्वच्छ – पारदर्शी प्रशासनाच्या माध्यमातून या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेले. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांची कारकीर्द महत्त्वाची होती. त्यांनी संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणास आणि शस्त्रसज्जतेस चालना दिली. त्यांच्या कारकीर्दीत भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उध्वस्त करणारा पहिला सर्जिकल स्ट्राईक केला. अत्यंत तडफदार, निस्पृह आणि कार्यक्षम नेते म्हणून ते परिचित होते.
त्यांनी सांगितले की, साधेपणा व सहजता हे मनोहर पर्रिकर यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी नेहेमीच पक्ष आपल्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे तत्व मानले. भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यांशीही ते सदैव आपुलकीने वागत असत.
मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने पक्षाची अपरिमित हानी झाली आहे. आपण त्यांना भाजपा, महाराष्ट्रतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो, असे खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur