गोवा विधानसभेत डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला

spot_img

पणजी : गोवा विधानसभेत डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने विश्‍वासदर्शक ठराव 20 विरूद्ध 15 मतांनी जिंकला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी ठरावाच्याविरोधात मतदान केले. मनोहर पर्रीकर सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावावेळी आलेमाव यांनी सरकारच्या बाजूने मतदान केले होते.

गोवा विधानसभेत सध्या चार जागा रिक्त आहेत. त्यामुळे विधानसभेचे संख्याबळ 36 झाले आहे. बहुमतासाठी 19 आमदारांची भाजपचा आवश्‍यकता होती. मात्र त्यांच्याबाजूने 21 आमदार असल्याचे दिसून आले. प्रभारी सभापतीपदी भाजपचेच मायकल लोबो होते. भाजपच्या 11 आमदारांसोबत, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 3, गोवा फॉरवर्डचे 3 तीन अपक्षांनी सरकारला पाठींबा दिल्याचे दिसून आले. ठरावाच्या विरोधात कॉंग्रेसच्या 14 व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकमेव आमदाराने मिळून 15 जणांनी मतदान केले. कॉंग्रेसने मतविभागणीची मागणी करण्याआधीच सभापतींनी मते मोजली होती.

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना निधन झाल्यावर त्यांच्याजागी डॉ. सावंत यांची निवड झाली. आज विश्‍वासमत आजमावून पाहण्याचा आदेश राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी दिला होता. मगोचे तीन आमदार विधानसभेत असले तरी त्यापैकी दीपक प्रभू पाऊसकर हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचा अंदाज भाजपच्या नेत्यांना आला होता. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर विधानसभा संकुलाबाहेर येऊन पाऊसकर यांची वाट पाहत सकाळी अर्धा तास उभे होते.पाऊसकर आल्यानंतर तेंडुलकर यांना घेऊन विधानसभा संकुलात गेले. विश्‍वासदर्शक ठरावावेळी पाऊसकर यांनी सरकारच्या बाजूने मतदान केल्यावरून तेंडुलकर यांची शिष्टाई यशस्वी ठरल्याचे दिसून आले. अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांचीही समजूत तेंडुलकर यांनी मतदानापूर्वी काढली होती.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़