‘गरिबी हटावचा’ नारा काँग्रेसने देशाला केलेले एप्रिल फुल-देवेंद्र फडणवीस

spot_img

गडचिरोली – मोदी सरकारने गरिबांचे हित लक्षात घेऊन अनेक योजना राबविल्या. विविध योजनांचे गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जाऊ लागले आहेत. ९८ टक्के कुटुंबाकडे आता शौचालये झाली आहेत. ५ कोटी कुटुंबांना गॅस दिले आहेत. मुद्रा कर्जाद्वारे अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गरिबांना घरे देण्याचे काम मोदी सरकारने केले. दळणवळणाचे महत्त्व लक्षात घेऊन या देशात महामार्गांचे जाळे विणण्याचे एक मोठे काम मोदी सरकारच्या काळात झाले,काँग्रेसने देशाला ५०-६० वर्षे ‘एप्रिल फुल’ बनविण्याचे काम केले. काँग्रेसकडून ते काम आताही सुरूच आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी २ एप्रिलला प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हे सुद्धा ‘एप्रिल फुल’ आहे. पंडित नेहरूंपासून देण्यात येणारा ‘गरीबी हटाव’चा नारा काँग्रेसकडून आजही देणे सुरूच आहे. पण देशातील गरीबी हटली नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागभीड येथे बोलताना केला.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़