
नागपूर: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दि.२५ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी निवडणूक अधिकाऱ्यां समोर त्यांनी आचार संहितेचे उल्लंघन केले.यानंतर त्यांनी आकाशवाणी चौकात कोणतीही पूर्व परवानगी न घेता सभेला संबोधित केले. या विरोधात उद्या गुरुवार २८ मार्च रोजी निवडणूक अधिकार्यांकडे आचार संहिता भंगाची रितसर तक्रार करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्र-परिषदेत सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले,की निवडणूक आयोगालाही तक्रारीत प्रश्न विचारणार आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षासाठी काम करता का? कुठलीही सभा घेण्याची पूर्व परवानगी नसताना राज्याचे मुख्यमंत्री देखील सभेला उपस्थित राहीले व त्यांनीही सभेला संबोधित केले. या संबधी उद्या निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे माजी आमदार अनीस अहमद यांनी अल्पसंख्याकांची मते गृहीत धरु नये असे वक्तव्य नुकतेच केले होते यावर उत्तर देताना अतुल लोंढे यांनी तेव्हा त्यांना हिदायत पटेल यांच्या उमदेवारीची माहिती नसल्याचे सांगितले. हिदायत पटेल यांना पक्षाने उमेदवारी दिल्याचे कळताच त्यांनी आनंद व्यक्त केला सध्या ते दोन राज्यात पक्षाच्या प्रचारात व्यस्त असल्याचे लोंढे यांनी सांगितले.

रिपाई(खोब्रागडे)संयुक्त पुरोगामी महाआघाडीत सामिल
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने संयुक्त पुरोगामी महाआघाडीत सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्ष्ाच्या शिष्टमंडळाने २३ मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष् अशोक चव्हाण यांची भेट घेऊन महाआघाडीत सहभागी होत असल्याचे जाहीर केले असल्याची माहिती नागपूर येथे पत्र परिषदेत आरपीआय खोब्रागडे गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष् सुनील रामटेके यांनी माहीती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे हे उपस्थित होते.
देशाच्या संविधानाचे संरक्ष् ण, लोकशाहीचे रक्ष् ण करण्यासाठी तसेच शेतकरी,बेरोजगार,कामगार, दलित, अल्पसंख्यांक अशाच सर्वच घटकांची फसवणूक करणार्या भाजप-शिवसेनेच्या सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी रिपाई(खोब्रागडे) पक्ष् ाने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे रामटेके यांनी सांगितले. देशात खासकरुन विदर्भात पक्ष् ाची चांगली ताकद आहे. विदर्भात पक्ष् ाचे खासदार आणि आमदार देखील राहीले आहेत. पाच ते सात महापौर पदेही पक्ष् ाने भूषवले असून आगामी लोकसभा निवडणूकीत वीस ते पंचवीस जागांवर काँग्रेसला जिंकून देणार असल्याचे ते म्हणाले. अनुसूचित जाती-जमातीच्या शिष्यवृत्तीतील घोळ यावर देखील नाराजी जाहीर केली. विकासाच्या मुद्दावर आम्ही एनडीएला पाठिंबा दिला होता मात्र यावेळी यूपीए सोबत अन्यायाविरुद्ध लढा देणार असल्याचे ते म्हणाले. महाआघाडीला पाठिंबा देण्यासाठी अशोक चव्हाण यांची भेट घेणार्या शिष्टमंडळात पक्ष् ाचे उपाध्यक्ष् डॉ.सेवक गजभिये, मुंबई प्रदेश अध्यक्ष् डॉ.उत्तमकुमार बागडे, मेजर योगेश जांभूळकर आदी नेते सहभागी होते.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur