काँग्रेसला आंबेडकरांचा अल्टिमेटम..!

spot_img

मुंबई – वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला आहे. ३० जानेवारीपर्यंत काँग्रेसने आघाडीचा व जागावाटपाच्या सूत्राचा अंतिम निर्णय घ्यावा. अन्यथा त्यानंतर वंचित बहुजन विकास आघाडी निर्णय घेण्यास मुक्‍त असेल, असा अल्टिमेटम दिला आहे.

आज पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले, की आम्ही काँग्रेसकडे १२ जागा मागितल्या आहेत. सप्टेंबर महिन्यापासून आम्ही काँग्रेससोबत आघाडीचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही एमआयएम सोबत आघाडीची चर्चा सुरू केल्यानंतर काँग्रेसने आमच्यासोबत युतीसंदर्भात बोलण्याचा प्रयत्न सुरू केल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यामुळे, आता काँग्रेसने ३० जानेवारीपर्यंत आघाडीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. वंचित आघाडीला लोकसभेच्या १७ मतदारसंघांत विजय मिळेल, असा दावा त्यांनी केला.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़