उमेदवारी अर्ज भरताना रविशंकरप्रसाद यांना ‘अजब ढंगाने गजब विरोध’

spot_img

बिहार: पाटनासाहेब येथे उमेदवारी अर्ज भरताना केंद्रिय मंत्री रविशंकरप्रसाद यांना सर्मथक व विरोधकांच्या नारेबाजीचा सामना करावा लागला. एकीकडे समर्थक हे त्यांच्या नावाचा जयघोष करीत होते तर त्याच ठिकाणी त्यांच्याच पक्ष् ातील विरोधकांनी ‘रविशंकर गो बॅक,आर.के.सिन्हा जिंदाबाद’ असा जयकारा देण्यास सुरवात केली. निवडणूकीच्या पहील्याच पायदानावर ‘अजब ढंगाचा हा गजब विरोध’बघून रविशंकर हे देखिल चक्रावून गेलेत.
सिनेअभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट कापून पाटना साहेब मधून यावेळी रविशंकर यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. मला आपल्याच गृहनगरमधून उमेदवारी मिळाली असल्याचा आनंद रविशंकर यांनी व्यक्त केला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष् अमित शहा यांचे त्यांनी विशेष आभार मानले. ही निवडणूक मुद्द्यांची असून ‘आशा बनाम अवसरवाद’यांची असल्याचे ते म्हणाले. पहील्याच दिवशी पक्षातून बंडालीचा त्यांना पुढे त्रास होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपचेच दूसरे ज्येष्ठ नेते गिरीराज सिंह यांना न विचारता बेगुसरायमधून तिकीट दिल्याने ते देखिल नाराज आहेत. नेहमीच आपल्या वक्तव्यातून इतरांना दू:खी करणारा हा नेता आज स्वत: दू:खी झाला आहे. माझ्या राजकारणाची सुरवात ही बेगुसराय मधूनच झाली आहे.येथील जनतेशी मला विशेष लगाव असल्याचे त्यांनी सांगितले तरी देखिल प्रदेश नेतृत्वाकडून त्यांना एकच उत्तर हवे आहे त्यांची परंपरागत सीट का बदलण्यात आली.तीच सीट नेमकी मित्र पक्षासाठी का सोडण्यात आली? येथे त्यांची लढाई सीपीएममधून उमेदवारी अर्ज भरणार्या कन्हैया कुमारशी होणार आहे. ‘एक कट्टरवादी सोच के खिलाफ क युवा की हूंकार’ असल्याचे विधान नुकतेच कन्हैया कुमार याने केले आहे.
या प्रभागात भूमिहरांची ४ लाख ७५ हजार मते आहेत.२ लाख ५० हजार मते मुस्लिमांची आहे. २ लाख मते कुर्मी तर दीड लाख मते यादवांची आहे. देशातील इतर अनेक लोकसभा लढतीमधील बेगुसरायची लढत याकडे देखील देशातील जनतेचे लक्ष् लागले आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़