नागपूर. इंदोरा चौकातील रजत टॉवरमधील एका फ्लॅटचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप व कोंडा तोडून घरातील 3 लाख 30 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कलम नानकचंद लालवानी (48) यांचे इंदोरा चौकातील रजत टॉवर येथील अपार्टमेंटमध्ये फ्लॅट क्रमांक 303 आहे. बुधवारी ते दुपारी बाराच्या दरम्यान घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान घरी कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप व कोंडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्याने घरातील कपाटात असलेले 30 हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 30 हजारांचा मुद्येमाल लांबविला. लालवानी हे दुपारी पावेने दोनच्या दरम्यान घरी परतल्यावर त्यांना चोरी झाल्याचे समजले. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.
इंदोऱ्यात लाखांची घरफोडी
Youtube वीडियोस
1
/
152
नगरसेविका पूजा परिहार यांनी दोन वेगवेगळ्या जातीचे प्रमाणपत्र घेऊन प्रशासन व नागरिकांची दिशाभूल केली
संविधानिक,शैक्षणिक हक्कासाठी संघर्ष सुरूच राहणार#short
फिरसे मोजणी और कब्जा#हिल टॉप लेआउट प्लॉट धारक कृती समिती की पत्रपरिषद
10 दिवसांचे अल्टिमेटम#मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाचा इशारा
इं.सतीश पेंदाम का बडा दावा#आश्रम स्कूलो की हो न्यायिक जाच#सभी आश्रम स्कूल काँग्रेस BJP के
३ विद्यार्थी आमरण उपोषणाला#नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या 22 व्या दिवशी नवीन वळण
1
/
152



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur