आंबेकरच्या भाच्याच्या चहाच्या ठेल्यावर सशस्त्र दरोडा
नागपूर. नंदनवन येथील व्यंकटेश कॉलोनीत सराईत गुंड संतोष आंबेकरच्या भाच्याच्या ठेल्यावर चहा घेण्यास आलेल्या प्रतिस्पर्धी टोळीतील सहा सदस्यांनी वाद घालून तलावारीने जखमी करीत हजारोंचा गल्ला लुटल्याची घटना उघडकीस आली. शैलेष ज्ञानेश्वर केदार (32, रा. इतवारी हायस्कूल, मोझरकर वाडा, दारोडकर चौक) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेष हा संतोष आंबेकरचा भाचा असून त्याचे व्यंकटेश कॉलोनीत चहा व मॅगीचा ठेला आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान शैलेष व त्याचे सहकारी रवी हेडाऊ ,आदर्श सातपुते हे ग्राहकांना चहा, मँगी तयार करून देण्यात व्यस्त होते.
..
-‘हम यहा के दादा है
दरम्यान आरोपी गणेश नाईक, भोला, आकीब ऊर्फ सोनू, पीयूष व त्याचे दोन साथीदारांनी तेथे चहा घेतला. शैलशने त्यांना चहाचे पैसे मागितले असता, आरोपींनी ‘कब से यह ठेला लगा रहा है, हमे पहचानता नही क्या, ‘हम यहा के दादा है, हमारे आदमीसे कभी पैसे नही लेना’ अशी धमकी देत भाईगिरी केली. यावरून त्यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणात आरोपींनी शैलेश याला गट्टू व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच आरोपीतांनी तलावारी काढून शैलेशच्या गळ्यातील सोन्याची चेन गल्ल्यातील रोख 14 हजार 800 रुपये असा एकूण 58 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने पळविला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. शैलेश संतोष आंबेकरचा भाचा असल्याने दोन टोळ्या एकमेकांशी भिडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur